कोल्हापूरात भयानक प्रकार! 7 वर्षे घर मालकाचा महिलेवर अत्याचार, जेव्हा सत्य समजले तेव्हा... 

Last Updated:

Kolhapur News: भाड्याच्या घरात राहणाऱ्या महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून घरमालकाने सात वर्षे अत्याचार केले. संबंधित घटना करवीर तालुक्यातील

Kolhapur News
Kolhapur News
Kolhapur News: भाड्याच्या घरात राहणाऱ्या महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून घरमालकाने सात वर्षे अत्याचार केले. संबंधित घटना करवीर तालुक्यातील शिये येथे घडली आहे. संबंधित आरोपीचे आधीच लग्न झाले असून त्याला 2 मुले असल्याची बाब पुढे आली तेव्हा महिलेला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यासंदर्भात तिघांविरोधील फिर्याद देण्यात आली आहे.
या प्रकरणात भोंदू बाबाही सामील
सविस्तर वृत्त असे की, पीडित महिला ही सावंतवाडीतील आहे. 2019 पासून रामनगर शिये येथे भाड्याने राहत आहे. घरमालकाचा मुलगा गैबीसाब यांनी मागील 7 वर्षांपासून लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केले. आरोपीचे लग्न झालेले आहे, त्याला 2 मुले आहेत. तरीही लग्नाचे आमिष दाखवलं आणि अत्याचार केले. या प्रकरणात गैबीसाब दस्तगीर लेंगरे (वय-35) आणि बेबीजान दस्तगीर लेंगरे (वय-50, रा. रामनगर शिये) आणि एका अज्ञात भोंदूबाबा यांच्या विरोधात पीडित महिलेने शिरोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे.
advertisement
जीवे मारण्याची दिली होती धमकी
त्याचबरोबर या प्रकरणात आरोपीने एका भोंदूबाबाकडून पीडितेच्या गळ्यात ताईत, लिंबू आणि गंडादोरा बांधण्यासाठी दिला होता. "हा ताईत टाकू नको आणि कुणाला सांगू नको, नाहीतर तुला मारून टाकेन", अशी धमकी गैबीसाब लेंगरे याने पीडित महिलेला दिली होती. ज्यावेळी पीडितेला गैबीसाबचे लग्न झाले आहे आणि त्याला 2 मुले आहे हे समजले, तेव्हा आपली फसवणूक केली आहे हे लक्षात आले. पीडित महिलेने शिरोली पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधांत फिर्याद दिलेली आहे. पोलिसांनी तिघांवर गुन्हा नोंद केलेला आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
कोल्हापूरात भयानक प्रकार! 7 वर्षे घर मालकाचा महिलेवर अत्याचार, जेव्हा सत्य समजले तेव्हा... 
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement