TRENDING:

'पतीचा स्पर्म काऊंट खूपच कमी', गर्भवती करण्यासाठी सासऱ्यासह नातेवाईकांकडून विवाहितेवर अत्याचार

Last Updated:

Crime News: एका विवाहित महिलेला गरोदर करण्यासाठी तिच्या सासऱ्याने आणि नणंदेच्या नवऱ्याने वारंवार लैंगिक अत्याचार केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
गुजरातच्या वडोदरा याठिकाणी एक नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. इथं एका विवाहित महिलेला गरोदर करण्यासाठी तिच्या सासऱ्याने आणि नणंदेच्या नवऱ्याने वारंवार लैंगिक अत्याचार केला आहे. या अत्याचारातून पीडित महिला गर्भवती राहिली होती. मात्र अलीकडेच तिचा गर्भपात झाला. यानंतर तिने नवापूरा पोलीस ठाण्यात जात आपल्या पतीसह सासरा आणि नणंदेच्या नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
News18
News18
advertisement

पतीने आपले अश्लील व्हिडीओ काढून व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप देखील ४० वर्षीय पीडित महिलेनं केला आहे. पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचं फेब्रुवारी २०२४ मध्ये वडोदरा येथील एका तरुणासोबत लग्न झालं होतं. लग्नानंतर काही आठवड्यात पीडितेच्या सासरच्यांनी 'तुझ्या वयामुळे तू गरोदर होण्यास सक्षम नाहीस' असं पीडितेला सांगितलं. तसेच दोघा पती पत्नीने फर्टिलिटी ट्रीटमेंट घ्यावी, असं सासरच्यांनी सल्ला दिला. पण जेव्हा मेडीकल रिपोर्ट समोर आले, तेव्हा पतीचा स्पर्म काऊंट खूपच आहे, त्यामुळे पीडित महिला गरोदर राहू शकत नसल्याचं समोर आलं.

advertisement

यानंतर महिलेनं आयपीएफ ट्रीटमेंट घेऊन गरोदर राहण्याचा प्रयत्न केला. पण यातही तिला यश मिळालं नाही. यानंतर तिने कोणतीही वैद्यकीय ट्रीटमेंट घेण्यास नकार दिला. तसेच आपण मूल दत्तक घेऊ, असा पर्याय तिने पतीसह सासरच्या कुटुंबीयांना सुचवला. मात्र सासरचे मंडळी याला तयार झाले नाहीत.

दरम्यान, जुलै २०२४ मध्ये पीडित महिला आपल्या रुममध्ये झोपली असताना आरोपी सासरा तिच्या खोलीत आला. त्याने जबरदस्ती करत सुनेवर लैंगिक अत्याचार केला. यावेळी पीडितेनं मदतीसाठी आरडाओरडा केला, यावेळी आरोपी सासऱ्याने तिला मारहाण केली. याबाबत जेव्हा तिने आपल्या नवऱ्याला सांगितलं, तेव्हा नवऱ्याने आपल्याला मूल हवं आहे. त्यामुळे गप्प राहा, अशी धमकी दिली. तसेच या घटनेची कुठेही वाच्यता केल्यास तुझे विवस्त्र फोटो सोशल मीडियात व्हायरल करेन, अशी धमकीही पतीने दिल्याचा आरोप विवाहितेनं केला. यानंतर सासऱ्याने अनेकदा पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. पण ती गरोदर राहिली नाही.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
सर्व पहा

यानंतर डिसेंबर २०२४ मध्ये पीडितेच्या नणंदेच्या नवऱ्यानेही तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केला. शेवटी जून २०२५ ती गरोदर राहिली. मात्र दुसऱ्याच महिन्यात तिचा गर्भपात झाला. या सगळ्या प्रकारानंतर जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तिने नवापूर पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या पतीसह सासरे आणि नणंदेच्या नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
'पतीचा स्पर्म काऊंट खूपच कमी', गर्भवती करण्यासाठी सासऱ्यासह नातेवाईकांकडून विवाहितेवर अत्याचार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल