कानपुर : पती पत्नीच्या वादाच्या अनेक घटना समोर येत असतात. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका व्यक्तीने आपल्याच बायकोला नोकरीवरुन निलंबित केले. त्याने आधी माहिती अधिकाराच्या टाकला आणि त्या माहिती अधिकाराच्या माध्यमातून माहिती मागवली. तसेच या आधारावर अधिकाऱ्यांकडे पत्नीची तक्रार केली. नेमकं हे प्रकरण काय आहे, हे जाणून घेऊयात.
advertisement
जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना महिला मुख्याध्यापकाविरोधात तक्रार मिळाली होती. त्या अनेकदा शाळेला कुलूप लटकावून दुसरीकडे निघून जातात. यामुळे याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत आहे. यानंतर आरटीआय अहवालात आरोप खरे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी या महिला मुख्याध्यापिकेला निलंबित केले.
काय आहे संपूर्ण घटना -
एटाच्या जलेसर परिसरातील रहिवासी मनीष कुमार हे वकील आहेत. तर त्यांच्या पत्नी विनाक्षी या कानपुरमध्ये बिधनू गटातील सपई गावातील पूर्व माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापिका पदावर कार्यरत आहेत. विनाक्षी या तिथे एकमेव शिक्षिका आहेत. त्यांचे पती मनीष यांनी सांगितले की, याचाच फायदा घेत मॅडम शाळेला कुलूप लावून दररोज गायब होत होत्या.
telegram-whatsapp च्या माध्यमातून लावला अनेकांना चूना, Online Gaming मधून गावातील मुलांचं कांड
त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गटशिक्षण अधिकाऱ्यांनी विनाक्षी यांना त्यांचा पगार कापून घेण्याचा इशाराही दिला होता. मात्र, तरीसुद्धा यानंतरही काहीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे त्यांच्या पतीने माहिती अधिकाराच्या माध्यमातून शाळेतील त्यांच्या हजेरीबाबत माहिती मागवली.
यानंतर याबाबतची माहिती मिळताच उच्च शिक्षणाधिकाऱ्यांकडे त्यांची तक्रार केली. यानंतर विनाक्षी यांना निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, आता सध्या पती-पत्नीच्या या घटनेची विभागात मोठी चर्चा होत आहे.
