TRENDING:

प्रेक्षकांना 440 वोल्टचा झटका! पाचव्या आठवड्यात शॉकिंग एव्हिक्शन, करण सोनावणेसोबत कोण आलं घराबाहेर?

Last Updated:

Bigg Boss Marathi 6: आजचा 'भाऊचा धक्का' ४४० वोल्टचा एक जबरदस्त धक्का देणारा ठरला. रितेश देशमुखने पाचव्या आठवड्यात असा काही ट्विस्ट आणला की, घरातील सदस्यांसह प्रेक्षकही अवाक झाले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : रविवारची संध्याकाळ म्हटली की बिग बॉस मराठीच्या चाहत्यांच्या काळजाची धडधड वाढते. कारण हा दिवस असतो घरातील एका स्पर्धकाचा निरोप घेण्याचा. पण आजचा 'भाऊचा धक्का' ४४० वोल्टचा एक जबरदस्त धक्का देणारा ठरला! रितेश देशमुखने पाचव्या आठवड्यात असा काही ट्विस्ट आणला की, घरातील सदस्यांसह प्रेक्षकही अवाक झाले. यावेळी डबल एव्हिक्शनचा वार झाला आणि दोन स्पर्धकांना घराबाहेर जावं लागलं.
News18
News18
advertisement

या आठवड्यात नॉमिनेशनच्या टांगत्या तलवारीखाली सहा जण होते, सचिन कुमावत, प्राजक्ता शुक्रे, करण सोनावणे, राकेश बापट, प्रभू शेळके आणि आयुष संजीव. रितेशने या एव्हिक्शनला वेगळीच कलाटणी देत ३-३ चे दोन गट पाडले. पहिल्या गटातून राकेश बापट सुरक्षित झाला, तर दुसऱ्या गटातून प्राजक्ता आणि प्रभू शेळके यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

पाचव्या आठवड्यात प्रेक्षकांना ४४० वोल्टचा झटका

advertisement

पण खरी मेख शेवटच्या तिघांमध्ये होती. करण सोनावणे, आयुष संजीव आणि सचिन कुमावत डेंजर झोनमध्ये उरले. रितेशने त्यांना सांगितलं की, "आता एकमेकांना शेवटचं भेटून घ्या, कारण यानंतर निरोप घेण्याची संधी मिळणार नाही." बेडरूममधील एका छोट्या गुप्त दारातून या तिघांनाही आत पाठवण्यात आलं, जिथे त्यांच्या बॅगा आधीच पॅक होत्या. त्यातील फक्त सेफ स्पर्धक पुन्हा मुख्यद्वारातून घरात येणार होता.

advertisement

दोन मित्र गेले आणि ग्रुप विखुरला

घरातील सदस्य डोळ्यांत तेल घालून वाट पाहत होते की त्या पॅक झालेल्या बॅगा घेऊन कोण बाहेर येतंय. थोड्या वेळाने मुख्य दरवाजा उघडला आणि आपल्या नावाची पाटी घेऊन सचिन कुमावत ने घरात प्रवेश केला. सचिन सुरक्षित झाला होता, पण त्याच्या चेहऱ्यावर आनंदाऐवजी दुःख होतं. कारण त्याचे दोन जवळचे मित्र करण सोनावणे आणि आयुष संजीव यांचा बिग बॉसच्या घरातील प्रवास तिथेच संपला होता.

advertisement

घरात पाऊल ठेवताच सचिनला हुंदके अनावर झाले आणि तो ढसाढसा रडला. या डबल एव्हिक्शनमुळे घरातील समीकरणांना मोठा तडा गेला आहे. विशेषतः प्राजक्ता, करण, आयुष, सचिन आणि सागर कारंडे यांचा जो एक भक्कम गट तयार झाला होता, तो आता कमजोर पडताना दिसत आहे.

आता मैदानात फक्त ११ योद्धे

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आल्याच्या दरात मोठी उलथापालथ, डाळींब आणि केळीला काय मिळाला आज भाव? Video
सर्व पहा

या दोन एक्झिट्समुळे आता स्पर्धेचा रंग आणखीनच गडद झाला आहे. १७ स्पर्धकांपासून सुरू झालेला हा प्रवास आता ११ जणांवर येऊन ठेपलाय. करणच्या जाण्याने घरातली मजा-मस्ती कमी होणार का? आणि आयुषच्या जाण्याने खेळातील रणनीती बदलणार का? हे पाहणं आता रंजक ठरेल.

मराठी बातम्या/मनोरंजन/
प्रेक्षकांना 440 वोल्टचा झटका! पाचव्या आठवड्यात शॉकिंग एव्हिक्शन, करण सोनावणेसोबत कोण आलं घराबाहेर?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल