सुरुवातीच्या काळात अभिजीत BMC च्या एका जुन्या इमारतीत राहायचा. त्याचवेळी एका प्रसिद्ध पत्रकाराने त्याची मुलाखत घ्यायला त्याच्या घरी भेट दिली होती. त्या इमारतीच्या पायऱ्यांवर “ही जागा असुरक्षित आहे” असा फलक लावलेला होता. हे वाचून त्या पत्रकाराने संपूर्ण मुलाखतीनंतर एक धक्कादायक हेडलाइन छापली, "अभिजीत सावंत बेघर!"
बातमी पसरताच आला बाळासाहेब ठाकरेंचा फोन
advertisement
आता तुम्ही म्हणाल, हे वाचून काय झालं? तर त्यानंतर अभिजीतला थेट बाळासाहेब ठाकरे यांचा फोन आला. अभिजीतला त्यांनी त्यांच्या घरी बोलावलं आणि अत्यंत आत्मीयतेने म्हणाले, "ती बातमी वाचली. माझा एक बिल्डर मित्र आहे, तुला घर देतो. चावी घे आणि तिथे राहायला जा."
एअरपोर्टवरच रोमँटिक झाला 60 वर्षांचा आमिर खान, लव्हबर्डचा खुल्लम-खुल्ला रोमान्स कॅमेरात कैद, VIDEO
हे ऐकून चकित झालेला अभिजीत नम्रपणे म्हणाला की, त्याने नवीन घरासाठी आधीच अर्धे पैसे भरले आहेत आणि जुन्या घरात अजूनही राहत आहे कारण नवीन घर तयार व्हायला वेळ लागतोय. यावर बाळासाहेब फक्त शांतपणे हसले आणि म्हणाले, "ठीक आहे, पण काही अडचण भासली तर सांग." अभिजीतने ही आठवण शेअर करताना स्पष्ट केलं की, “ते घर मला प्रिय होतं, मी तिथे मोठा झालो होतो. पण या एका चुकीच्या बातमीमुळे किती मोठं वादळ उठलं, याची कल्पनाही नव्हती.”
आजही अभिजीत सावंत त्याच्या मधुर गाण्यांमुळे आणि साधेपणामुळे लोकांच्या मनात आपली जागा टिकवून आहे. 'मोहब्बते लुटाऊंगा', 'सर सुखाची श्रावणी' ही त्याची गाणी अजूनही अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये आहेत. पण ही बाळासाहेबांसोबतची आठवण, अभिजीतच्या आयुष्यात एक वेगळंच स्थान ठेवून आहे.