एअरपोर्टवरच रोमँटिक झाला 60 वर्षांचा आमिर खान, लव्हबर्डचा खुल्लम-खुल्ला रोमान्स कॅमेरात कैद, VIDEO
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Aamir Khan-Gauri Spratt Affair : आमिर खान आणि त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट यांचा मुंबई एअरपोर्टवरील व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
मुंबई : बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखला जाणारा आमिर खान सध्या केवळ त्याच्या आगामी चित्रपटामुळे नाही, तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. 'सितारे जमीन पर' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. पण या ट्रेलरपेक्षाही सध्या चर्चेचा विषय आहे, तो म्हणजे आमिरचं नव्यानं समोर आलेलं प्रेमप्रकरण.
काही महिन्यांपूर्वीच आमिर खाननं आपली गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट हिला मीडियासमोर अधिकृतरीत्या सादर केलं. 60व्या वाढदिवसानिमित्त आयोजित एका खास समारंभात त्याने गौरीसोबतचं नातं उघड केलं आणि तेव्हापासून त्यांची एकत्र झलक दिसली की सोशल मीडियावर खळबळ माजते.
मुंबई एअरपोर्टवरील नवा व्हिडिओ व्हायरल
आता पुन्हा एकदा त्यांचा मुंबई एअरपोर्टवरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत दिसतं की, गौरी आमिरला एअरपोर्टवरून घ्यायला आली होती. आमिर जसा कारजवळ येतो, तसाच गौरी पटकन दुसऱ्या सीटवर शिफ्ट होते आणि आमिरसाठी जागा करते. मात्र कॅमेऱ्यांकडे लक्ष जाताच ती आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न करते, हे दृश्य अनेकांनी टिपलं.
advertisement
advertisement
व्हिडिओमध्ये पुढे गाडी वळताच आमिर गौरीला किस करताना दिसतो. आमिर गौरीच्या दिशेने झुकतो आणि गौरीही त्याला किस करते. दरम्यान, आमिर आणि गौरीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. अनेकांनी त्यांच्या बहरलेल्या प्रेमावर कौतुकाचा वर्षाव केला, तर काहींनी त्यांना ट्रोलही केले.
या व्हिडिओत आमिरने प्रिंटेड कुर्ता आणि निळी धोती पायजमा असा एकदम पारंपरिक वेश परिधान केला होता, तर गौरीने पांढऱ्या कुर्तीसोबत निळी डेनिम जीन्स घातली होती. दोघंही कारमध्ये बसताना पॅप्सना हसत हात हलवून अभिवादन करताना दिसले.
advertisement
गौरी स्प्रॅट ही केवळ आमिरची पार्टनर नाही, तर अनेक वर्षांपासून त्याच्या प्रोडक्शन हाऊसशी जोडलेली एक विश्वसनीय सहकारी आहे. दोघांची जवळीक गेल्या दीड वर्षात वाढली असून, आता ती एका नव्या नात्याच्या रुपात समोर आली आहे.
या सगळ्या घडामोडींमुळे अनेक चाहत्यांनी उत्सुकतेनं प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी आमिरच्या नव्या आयुष्याला शुभेच्छा दिल्या आहेत, तर काहींनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 17, 2025 4:57 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
एअरपोर्टवरच रोमँटिक झाला 60 वर्षांचा आमिर खान, लव्हबर्डचा खुल्लम-खुल्ला रोमान्स कॅमेरात कैद, VIDEO