TRENDING:

Janhvi Kapoor: आईच्या आठवणीत जान्हवी कपूर पोहोचली तिरुपती बालाजीला, बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत घेतलं दर्शन

Last Updated:

ग्लॅमर आणि हॉट अंदाजाने घायाळ करणारी बॉलिवूडची यंग अभिनेत्री म्हणजे जान्हवी कपूर. ती सतत लाइमलाइटमध्ये असते. सोशल मीडियावरही बरीच सक्रीय असते. अशातच जान्हवी पुन्हा एकदा चर्चेत आलीय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : ग्लॅमर आणि हॉट अंदाजाने घायाळ करणारी बॉलिवूडची यंग अभिनेत्री म्हणजे जान्हवी कपूर. ती सतत लाइमलाइटमध्ये असते. सोशल मीडियावरही बरीच सक्रीय असते. अशातच जान्हवी पुन्हा एकदा चर्चेत आलीय. जान्हवीनं तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं. बॉयफ्रेंडसोबतचा तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
आईच्या आठवणीत जान्हवी कपूर पोहोचली तिरुपती बालाजीला
आईच्या आठवणीत जान्हवी कपूर पोहोचली तिरुपती बालाजीला
advertisement

जान्हवी कपूरने काल बॉयफ्रेंडसोबत तुरुपती बालाजीचं दर्शन घेतलं. यामागचं कारण म्हणजे दिवंदत श्रीदेवीची बर्थ अॅनिवर्सरी. आईच्या वाढदिवशी जान्हवी खास तिरुपतीला गेली होती. सोबत तिचा बॉयफ्रेंड शिखर पहाडियाही होता. दोघांनी सोबत दर्शन घेतलं.

OTT वर येताच 'या' संस्कारी सूनांनी दिले इंटीमेट सीन, एकापेक्षा एक थक्क करणाऱ्या सीरिज!

जान्हवी आपल्या आईच्या खूप क्लोज होती. श्रीदेवीच्या निधनानंतर जान्हवीनं शपथ घेतली होती की ती दरवर्षी आईच्या वाढदिवशी तिरुपती बालाजीच्या दर्शनाला येईल. जान्हवीने फोटो शेअर करत आई श्रीदेवीला बर्थ डे विश केलं.

advertisement

जान्हवीनं यावेळी केलेला साऊथ इंडियन लूक लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. तिचा हा लूक खूपच सुंदर असून ती खूप छान दिसतेय. जान्हवीनं डार्क शाइनी पिवळ्या रंगाची साडी नेसली असून हिरव्या रंगाचा ब्लाऊज घातलाय. गोल्डन रंगाची ज्वेलरी घातलीय.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कृषी मार्केटमध्ये मोठी उलथापालथ, केळी आणि कांद्याला कवडीमोल भाव, लिंबाची काय स्थिती?
सर्व पहा

दरम्यान, ग्लॅमरस असणारी जान्हवी देवाला खूप मानते. ती अनेकदा मंदिरात स्पॉट होती. तिचा देवावरचा विश्वास कायम पहायला मिळतो. सध्या जान्हवीचा तिरुपती दर्शनाचा व्हिडीओ व्हायरल होत असून लोक कमेंट करत तिचं कौतुक करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Janhvi Kapoor: आईच्या आठवणीत जान्हवी कपूर पोहोचली तिरुपती बालाजीला, बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत घेतलं दर्शन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल