मलायका अरोराने तिचा लेक अरहान खानसोबत मिळून वांद्रेमध्ये नवं रेस्टॉरंट सुरू केलंय. वांद्रेतील पाली गावातील मलायकाच्या रेस्टॉरंटचं नाव आहे 'स्कार्लेट हाऊस'. हे खास रेस्टॉरंट 90 वर्ष जुन्या इंडो-पोर्तुगीज बंगल्यात सुरू करण्यात आलं आहे. नुकतंच या रेस्टॉरंटचं मेन्यू कार्ड सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
मलायकाला पाहताच उतावळे झाले आजोबा, केलं असं काही की अभिनेत्रीच म्हणाली, 'अहो थांबा'
advertisement
मलायकाने तिच्या इंस्टास्टोरीवर तिच्या खास 'स्कार्लेट हाऊस' रेस्टॉरंटचं मेन्यू कार्ड शेअर केलं. यामध्ये तिनं खास मेन्यू काय आहे याची एक झलक दाखवली. 'मल्लाज स्पेशल' सेक्शन तिने चाहत्यांना दाखवला. फोटोमध्ये पाहून शकता, मलायकाच्या रेस्टॉरंटमध्ये स्पेशल पनीर ठेसा मिळतो. या पदार्थाची किंमत आहे 525. त्यानंतर मसाला खिचडी आहे, त्याची किंमत 550 आहे. याशिवाय खास मेन्यूमध्ये कॅरेमल्ज ओनियन पास्ताही आहे. याची किंमत 550 आहे.
दरम्यान, मलायकाच्या रेस्टॉरंटचं मेन्यू कार्ड व्हायरल होताच चाहत्यांच्या कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव सुरू झाला आहे. आजवर अनेक सेलिब्रिटी लोकांनी या रेस्टॉरंटला भेट दिली आहे.
