advertisement

मलायकाला पाहताच उतावळे झाले आजोबा, केलं असं काही की अभिनेत्रीच म्हणाली, 'अहो थांबा'

Last Updated:

malaika arora elderly uncle video : मलायकाला पाहताच म्हाताऱ्या आजोबांनी जी काही रिएक्शन दिली आहे ती कॅमेरात कैद झाली आहे. मलायकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मलायका अरोरा
मलायका अरोरा
मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा बॉलिवूडची टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. 50 वर्षांची मलायका आजही वीशीतील तरुणीसारखी दिसते. तिच्या फिटनेसवर आणि सौंदर्यावर तरूण फिदा आहेत. मलायकाची एक झलक पाहण्यासाठी अनेक चाहते तिची वाट पाहत असतात. पण केवळ तरुणच नाही तर मलायकाच्या सौंदर्यावर 60 वर्षांचे आजोबा देखील फिदा आहेत. मलायकाला पाहताच म्हाताऱ्या आजोबांनी जी काही रिएक्शन दिली आहे ती कॅमेरात कैद झाली आहे. मलायकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याला पसंती मिळतेय.
अभिनेत्री मलायका सध्या चॅम्पियन का टशन या शोमध्ये काम करतेय. नुकतीच ती या शोच्या सेटवर स्पॉट झाली. शिमरी बॉडीकॉन ड्रेसमध्ये मलायका समोर आली. हा ड्रेस तिच्यावर चांगलाच खुलून दिसत होता. नेहमीप्रमाणे मलायका हॉट आणि ग्लॅमरस दिसत होती.
advertisement
मलायका शुटींगसाठी सेटवर जातच होती तेवढ्यात मलायकाचे एक वृद्ध फॅन्स तिच्यासमोर आले. एक आजाबो आले आणि मलायकाबरोबर फोटो काढण्यास सांगू लागले. आजोबा मलायकाला भेटल्यानंतर प्रचंड खूश होते. त्यांना काय बोलावं हे कळत नव्हतं.
advertisement
व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय की, आजोबा मलायकाला फोटोसाठी रिक्वेस्ट करतात. त्यांनी सोबत त्यांच्या पत्नीला देखील आणलं होतं. त्यांची पत्नी देखील मलायकाची फॅन होती. ते त्यांच्याबरोबर पत्नीला देखील फोटो काढण्यासाठी बोलावत आहेत.
या सगळ्यात मलायकाने देखील शांतपणे संपूर्ण परिस्थिती हाताळली. तिने त्या वृद्ध दाम्पत्याला बोलावलं. त्यांच्याबरोबर फोटो क्लिक केले. मलायका यावेळी खूप शांत दिसली. मलायकाबरोबर फोटो क्लिक केल्यानंतर वृद्ध दाम्पत्य खूप खुश असल्याचे पाहायला मिळालं. मलायका आणि वृद्ध दाम्पत्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
मलायकाला पाहताच उतावळे झाले आजोबा, केलं असं काही की अभिनेत्रीच म्हणाली, 'अहो थांबा'
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement