अभिनेत्री ऐश्वर्या रायनं दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तिथे तिनं याचिका दाखल केली आहे. ऐश्वर्या रायनं डिवोर्स संदर्भात नाही तर तिच्या व्यक्तिमत्त्वाच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. काही दिवसांआधीच ऐश्वर्या आणि अभिषेक एकत्र एअरपोर्टवर स्पॉट झाले होते. दोघांमध्ये सगळं काही आलबेल आहे असं त्यांनी दाखवून दिलं होतं.
advertisement
( शिल्पा शेट्टी-राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या, 60 कोटी फसवणूक प्रकरणात मुंबई पोलिसांकडून समन्स )
ऐश्वर्या रायनं आता दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तिने तिच्या याचिकेत म्हटले आहे की, तिचे व्यक्तिमत्त्व, नाव, चित्रे, आवाज आणि ओळख कोणत्याही प्रकारे बेकायदेशीरपणे वापरली जाऊ नये. यापूर्वी अमिताभ बच्चनसह अनेक मोठ्या स्टार्सनीही त्यांच्या हक्कांसाठी न्यायालयात धाव घेतली आहे. जिथे त्यांनी आर्थिक लाभ मिळविण्यासाठी परवानगीशिवाय त्यांचे फोटो आणि आवाज वापरणाऱ्यांवर बंदी घालण्याची मागणी केली होती.
न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या खंडपीठाने या याचिकेच्या सुनावणीत म्हटले आहे की, अभिनेत्रीच्या व्यक्तिमत्त्वाच्या हक्कांचे उल्लंघन करणारे URL काढून टाकावे लागतील. हे थेट ऐश्वर्या रायच्या व्यक्तिमत्त्वाच्या हक्कांचे उल्लंघन करतात.
न्यायमूर्ती तेजस म्हणाले की, तक्रारी मोठ्या असल्याने आम्ही सर्वांविरुद्धच्या लिंक्स काढून टाकण्याचे आदेश देऊ. परंतु प्रत्येकासाठी वेगळे आदेश जारी केले जातील. ऐश्वर्या रायने दाखल केलेल्या याचिकेत तिचे नाव, प्रतिमा, व्यक्तिमत्त्व, आवाज आणि इतर वैशिष्ट्यांचे संरक्षण करण्याची मागणी करण्यात आली होती.
ऐश्वर्या रायच्या वकिलांनी आपला मुद्दा मांडला
ऐश्वर्या रायच्या वतीने बाजू मांडणारे प्रवीण आनंद आणि ध्रुव आनंद यांनी याचिकेत म्हटले आहे की, अनेक संस्था नफा कमावण्याच्या उद्देशाने अभिनेत्रीच्या व्यक्तिमत्त्वाच्या अधिकारांचे उल्लंघन करत आहेत. जिथे तिचे नाव, फोटो आणि व्हिडिओ त्यांच्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी प्रसिद्धीसाठी वापरले जात आहेत. इतकेच नाही तर अनेक अश्लील व्हिडिओ देखील छेडछाड करून ऐश्वर्याच्या प्रतिमेशी जोडले जात आहेत.
लैंगिक इच्छेसाठी अभिनेत्रीची प्रतिमा कलंकित करण्याचा प्रयत्न
ज्येष्ठ वकील संदीप सेठी यांनी असेही म्हटले आहे की, लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीचे नाव आणि प्रतिमा देखील वापरली जात आहे. जे कोणीही सहन करणार नाही.
याआधीही स्टार्सनी हे पाऊल उचलले आहे बॉलिवूड अभिनेत्याने त्याच्या व्यक्तिमत्त्व आणि प्रसिद्धी हक्कांसाठी न्यायालयात धाव घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी जॅकी श्रॉफ, अमिताभ बच्चन, अनिल कपूर सारख्या लोकांनीही हे पाऊल उचलले होते.