अमिताभ यांच्या लेकीला आवडलेली फिल्म
KBC 17 च्या एपिसोडदरम्यान ऋषभ आणि अमिताभ बच्चन यांच्यातील संवाद सुरू होताच तो भावनिक वळणावर गेला. ऋषभ यांनी अतिशय नम्रतेने बिग बींना सांगितले, “मी ऐकलं आहे की तुम्ही कलाकारांना त्यांच्या अभिनयाबद्दल पत्र लिहिता. कधी मला असं पत्र मिळालं, तर ते माझ्यासाठी आशीर्वादासारखं असेल.” यावर अमिताभ बच्चन हसत म्हणाले,“मला तुमचा चित्रपट अजून पाहता आला नाही, याबद्दल माफी. तुम्हाला माहीत आहे, आमचं काम किती व्यस्त असतं. पण माझी मुलगी श्वेताने ‘कांतारा’ पाहिला होता आणि तिचं म्हणणं आहे की या चित्रपटाने तिला आतून हादरवून टाकलं. विशेषतः शेवटचा सीन पाहून ती इतकी प्रभावित झाली की अनेक दिवस तिला झोपच आली नाही. ती सतत विचारत होती की त्या दृश्यात तू ती लय कशी साधलीस?”
advertisement
ऋषभचं लग्न कसं झालं?
अमिताभ बच्चन यांचं हे बोलणं ऐकूण ऋषभ शेट्टी भावूक झाला होता आणि त्यांनी आपल्या प्रवासाबद्दल व संघर्षांबद्दलही सांगितलं. संवादादरम्यान ऋषभ यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही भाष्य केलं. त्यांनी सांगितलं की जेव्हा ते फिल्म इंडस्ट्रीत नवे होते आणि कोणीही त्यांना ओळखत नव्हतं, तेव्हाच त्यांची प्रगतीशी भेट झाली. ते म्हणाले, “माझा चित्रपट रिलीज झाला होता, पण तरीही कोणी मला ओळखत नव्हतं. मला आठवतं, एकदा मला बाजूला काढण्यात आलं होतं आणि तेव्हाच मी तिला पाहिलं. त्या काळात IMDb वर माझ्या चित्रपटाची रेटिंगसाठी व्होटिंग सुरू होती, ती रेटिंग मी तिला पाठवली. तिथूनच आमचा संवाद सुरू झाला आणि एका वर्षाच्या आत आम्ही लग्न केलं. आता आम्हाला दोन मुलं आहेत आणि तीच माझी सर्वात मोठी ताकद आहे.”
