गुळाची आवक दबावात
राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 687 क्विंटल गुळाची आवक झाली. यापैकी पुणे बाजारात 349 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 4315 ते 4451 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच सोलापूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 178 क्विंटल गुळास 4225 रुपये सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, सोयाबीन दरात वाढ नाहीच, कांद्याला किती मिळाला भाव? Video
advertisement
शेवग्याच्या दराचा उच्चांक
राज्याच्या मार्केटमध्ये आज केवळ 2 क्विंटल शेवग्याची आवक झाली. यापैकी पुणे बाजारात आवक झालेल्या एक क्विंटल शेवग्यास सर्वाधिक 35000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला. तसेच अहिल्यानगर मार्केटमध्ये आवक झालेल्या 1 क्विंटल शेवग्यास 8000 ते 10000 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला.
डाळिंब तेजीत
आज राज्याच्या मार्केटमध्ये 75 क्विंटल डाळिंबाची एकूण आवक राहिली. यापैकी सोलापूर मार्केटमध्ये 26 क्विंटल डाळिंबाची सर्वाधिक आवक झाली. त्यास प्रतीनुसार 7500 ते 14000 हजार रुपये बाजारभाव मिळाला. तसेच सोलापूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 19 क्विंटल भगवा डाळिंबास प्रतीनुसार 6500 ते 18500 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला.





