जिवंत सातबारा मोहीमेचा दुसरा टप्पा सुरू! आता शेतकऱ्यांना या नोंदी करता येणार

Last Updated:

Agriculture News : महसूल विभागामार्फत नागरिकांच्या जमिनीविषयक नोंदी अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक करण्यासाठी ‘जिवंत सातबारा मोहीम – टप्पा 2’ राबविण्यात येणार आहे.

satbara utara
satbara utara
पुणे : जमिनीशी संबंधित नोंदी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्याच्या उद्देशाने महसूल विभागाकडून ‘जिवंत सातबारा मोहीम टप्पा 2’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही विशेष मोहीम 26 डिसेंबर 2025 ते 26 जानेवारी 2026 या कालावधीत बारामती तहसील कार्यालयाच्या माध्यमातून राबवली जाणार असून, नागरिकांनी या संधीचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी केले आहे. विशेषतः शेतकरी, भूमिधारक, वारसदार आणि महिला हक्कधारकांसाठी ही मोहीम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
advertisement
सातबारा उतारा हा जमिनीच्या मालकी हक्काचा महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो. मात्र, अनेकदा यामध्ये कालबाह्य नोंदी, चुकीची माहिती, अपूर्ण फेरफार किंवा वारसांच्या नोंदींचा अभाव दिसून येतो. अशा त्रुटीमुळे शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ घेताना, बँक कर्ज मिळवताना किंवा जमीन खरेदी-विक्री व्यवहार करताना अडथळे येतात. या समस्या दूर करण्यासाठी शासनाने ‘जिवंत सातबारा’ ही विशेष मोहीम सुरू केली असून, त्यामध्ये नागरिकांना स्वतःच्या जमिनीच्या नोंदी सुधारण्याची संधी दिली जाणार आहे.
advertisement
कोणत्या नोंदी करता येणार?
या मोहिमेअंतर्गत सातबारा उताऱ्याशी संबंधित विविध सुधारणा करता येणार आहेत. त्यामध्ये सातबारा अद्ययावत करणे, अनावश्यक व कालबाह्य नोंदी वगळणे, एकूण नोंदीतील त्रुटी दुरुस्त करणे, तसेच इतर हक्क सदरामधील महिला वारसांच्या नोंदी कब्जेदार सदरामध्ये समाविष्ट करणे यांचा समावेश आहे. अनेक प्रकरणांमध्ये महिला वारसांचे हक्क केवळ इतर हक्कांपुरते मर्यादित राहतात. या मोहिमेमुळे महिलांचे मालकी हक्क अधिक ठोसपणे नोंदवले जाणार असून, त्यांना कायदेशीर व आर्थिक बळ मिळणार आहे.
advertisement
याशिवाय, रहिवासी विभागातील तुकडेबंदी कायद्याअंतर्गत अडकलेले व्यवहार विनामूल्य नियमित करण्याची सुविधाही या मोहिमेत देण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले व्यवहार मार्गी लागण्यास मदत होणार आहे. तसेच ‘लक्ष्मी मुक्ती योजना’अंतर्गत पत्नीचे नाव सातबारा उताऱ्यावर नोंद करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे महिलांच्या नावावर मालमत्ता नोंद होऊन कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेला चालना मिळणार आहे.
advertisement
मोफत सेवा असणार
या मोहिमेतील सर्व सेवा पूर्णपणे मोफत असणार आहेत, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे. कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. नागरिकांनी अर्ज करताना संबंधित जमिनीचा सातबारा उतारा, फेरफार नोंदी तसेच आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया सुलभ ठेवण्यात आली असून, नागरिकांना अनावश्यकपणे कार्यालयांचे फेरे मारावे लागू नयेत, याची काळजी महसूल प्रशासनाकडून घेतली जाणार आहे.
advertisement
नागरिकांनी अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे आपल्या संबंधित महसूल मंडळातील मंडळ अधिकारी यांच्या कार्यालयात सादर करावीत. 26 जानेवारी 2026 पूर्वी अर्ज दाखल केल्यास, त्या कालावधीतच नोंदींचे नियमितीकरण पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी शेवटच्या दिवसाची प्रतीक्षा न करता लवकरात लवकर अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ‘जिवंत सातबारा मोहीम टप्पा २’ ही जमिनीच्या नोंदी दुरुस्त करून भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी एक महत्त्वाची संधी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/कृषी/
जिवंत सातबारा मोहीमेचा दुसरा टप्पा सुरू! आता शेतकऱ्यांना या नोंदी करता येणार
Next Article
advertisement
Raj Thackeray : राज ठाकरेंनी जी भीती व्यक्त केली ती १२ तासात खरी ठरली, जुना शिलेदार फुटला!
राज ठाकरेंनी जी भीती व्यक्त केली ती १२ तासात खरी ठरली, जुना शिलेदार फुटला!
  • राज ठाकरेंनी जी भीती व्यक्त केली ती १२ तासात खरी ठरली, जुना शिलेदार फुटला!

  • राज ठाकरेंनी जी भीती व्यक्त केली ती १२ तासात खरी ठरली, जुना शिलेदार फुटला!

  • राज ठाकरेंनी जी भीती व्यक्त केली ती १२ तासात खरी ठरली, जुना शिलेदार फुटला!

View All
advertisement