'मी कोणालाही माझा अपमान करू देणार नाही...' 2025 संपताना प्राजक्ता माळीनं अखेर मनातलं सांगितलं
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेत्री प्राजक्ता माळीनं शेअर केलेल्या एका पोस्टमधून तिनं अखेर तिच्या मनातालं सांगितलं आहे. 2025 संपत असताना प्राजक्ताची ही पोस्ट चर्चेत आली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
जुळून येती रेशमीगाठी या मालिकेतून प्राजक्ता माळी महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. त्यानंतर तिने अनेक सिनेमात काम केलं. प्राजक्तानं मधल्या काळात तिची नवी ओळख निर्माण केली. अभिनेत्री असण्याबरोबरच प्राजक्ता एक बिझनेसवुमन देखील आहे. फुलवंती सिनेमाच्या निमित्तानं तिनं निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केलं.
advertisement
2025 हे वर्ष प्राजक्तासाठी चढ उतारांचं होतं. करिअरमध्ये यश मिळवत असताना दुसरीकडे प्राजक्ताला ट्रोल देखील करण्यात आलं. तिच्यावर टीका करण्यात आली ज्यामुळे तिला प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. तर दुसरीकडे तिच्या फुलवंती सिनेमाला प्रेक्षकांचं अमाप प्रेम मिळालं. तिला या सिनेमासाठी पुरस्कार देखील मिळाले. अखेर या पोस्टच्या निमित्तानं प्राजक्तानं तिच्या मनातील गोष्ट सांगून टाकली.








