Guru Margi 2026: कठीण काळाची पुन्हा सुरुवात! अतिचारी गुरू ग्रह मार्गी, या 4 राशींना हाल सोसावे लागणार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Guru Margi 2026: मार्च महिन्याच्या सुरुवातीला ग्रहांच्या स्थितील बदल काही राशींना काळजी करायला लावणारे आहेत. 11 मार्च रोजी देवांचे गुरू गुरू ग्रह मिथुन राशीत मार्गी होणार आहेत, म्हणजेच ते आता सरळ चाल चालणार आहेत. सुमारे 9 महिन्यांनंतर म्हणजेच 13 डिसेंबरपर्यंत गुरु मार्गी राहतील. ज्योतिषशास्त्रानुसार शिक्षण, संतान, धन आणि भाग्याचा कारक असलेला गुरु ग्रह सकाळी 8 वाजून 56 मिनिटांनी आपली चाल बदलेल. मार्गी गुरुचा प्रभाव सर्व राशींवर पडणार असला तरी 13 डिसेंबरपर्यंत खालील राशींनी विशेष सावध राहण्याची गरज आहे.
मिथुन - गुरू तुमच्याच राशीच्या लग्न भावात म्हणजेच पहिल्या स्थानावर मार्गी होत आहे, त्यामुळे तुम्हाला अनेक बाबतीत सावधगिरी बाळगावी लागेल. या काळात मिथुन राशीच्या लोकांसाठी काही गुंतागुंतीच्या परिस्थिती निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे बरीच धावपळ करावी लागेल. चालू असलेल्या कामात अचानक अडथळे येणे, योजनांना उशीर होणे किंवा एखाद्या विश्वासू व्यक्तीसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे.
advertisement
advertisement
कर्क - तुमच्या राशीपासून 12 व्या भावात गुरु मार्गी होणार आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या पैशांच्या देवाणघेवाणीत जपून राहा आणि वादांपासून दूर राहा. नोकरी करणाऱ्यांनी या काळात विशेष काळजी घ्यावी; अधिकारी आणि सहकाऱ्यांशी बोलताना शब्द जपून वापरा आणि आपल्या कामावर लक्ष द्या. एखादे काम लवकर पूर्ण करण्यासाठी शॉर्टकट वापरण्याचा विचार करत असाल, तर थांबून पुन्हा विचार करा. या काळात संयम आणि समजूतदारपणा हीच तुमची मोठी ताकद ठरेल. कोणताही मोठा निर्णय घेताना अनुभवी लोकांचा सल्ला आणि पूर्ण माहिती घेतल्याशिवाय पाऊल उचलू नका, जेणेकरून नुकसान टाळता येईल.
advertisement
advertisement
वृश्चिक - 13 डिसेंबरपर्यंत वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीत 'नो-रिस्क' घेण्याचा काळ आहे. शेअर बाजार किंवा कोणत्याही जोखमीच्या गुंतवणुकीपासून दूर राहणे शहाणपणाचे ठरेल. लवकर नफ्याच्या हव्यासापोटी घेतलेले निर्णय नुकसान करू शकतात. तसेच, कुटुंबातील सदस्यांसोबत मतभेद होण्याची शक्यता असल्याने शांत राहण्याचा प्रयत्न करा.
advertisement
मकर - गुरु ग्रह तुमच्या राशीपासून सहाव्या भावात मार्गी होत आहे, त्यामुळे नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांनी सावध राहणे आवश्यक आहे. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या आणि रागाच्या भरात किंवा घाईघाईत ड्रायव्हिंग करू नका. मानसिक शांतता टिकवण्यासाठी विनाकारण वादात पडू नका आणि छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिका. मकर राशीच्या लोकांसाठी काही परिस्थिती अचानक बदलू शकते, त्यामुळे सतर्क राहणे गरजेचे आहे. 13 डिसेंबरपर्यंत गुप्त शत्रूंपासून सावध राहा आणि केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)










