advertisement

'ते एक टक्काही गेमसाठी नव्हतं', Bigg Boss मधून जाता जाता रुचिताने अखेर तिचा खरा चेहरा दाखवला

Last Updated:

Bigg Boss Marathi 6 च्या घरातून बाहेर पडताना तिने सगळ्यांसमोर माफी मागितली. या माफीबरोबर तिने तिचं खरं रुप देखील सगळ्यांसमोर आणलं.

News18
News18
बिग बॉस मराठी 6 मधून या आठवड्यात रुचिता जामदार घरातून बाहेर गेली. एलिमिनेशननंतर घरातून बाहेर पडताना रुचिता खूपच भावूक झालेली दिसली. घरात असताना रुचिताचे अनेक स्पर्धकांसोबत वाद झाले होते. तिच्या आक्रमक स्वभावामुळे ती सतत चर्चेत राहिली होती. मात्र घरातून बाहेर पडताना तिने सगळ्यांसमोर माफी मागितली. या माफीबरोबर तिने तिचं खरं रुप देखील सगळ्यांसमोर आणलं.
एलिमिनेशननंतर घरातून बाहेर पडताना रुचिता खूपच भावूक झालेली दिसली. तिने दिपालीच्या पाया पडून तिची माफी मागितली. त्यानंतर तिने तिला मिठी मारून रडायला सुरुवात केली. हा क्षण पाहून घरातील इतर सदस्यही भावूक झाले.
रुचिताने घरातून जाताना सर्व स्पर्धकांची माफी मागितली. ती रडत रडत म्हणाली, "मला सगळ्यांना सॉरी म्हणायचं आहे. तन्वी तुलापण सॉरी. मी जे काही बोलले त्यातलं एक टक्काही गेमसाठी नव्हतं. मी अशीच आहे. चुकीची तर चुकीची."
advertisement
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताना रुचिताने व्यक्त केलेल्या भावना प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरत आहेत. तिच्या या निरोपानंतर घरातील पुढील घडामोडी कशा घडतात, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
बिग बॉसच्या घरातील समीकरण प्रत्येक आठवड्याला बदलतात. या आठवड्यातही घरातील सदस्यांबरोबर प्रेक्षकांनाही मोठा धक्का मिळला. रुचिता जामदार बिग बॉसमधून आऊट झाली. तिच्या एलिमिनेशननंतर घरातील स्पर्धक विशाल पूर्णपणे कोसळल्याचं पाहायला मिळालं. रुचिता बिग बॉसमधून बाहेर पडणत असताना विशालला आपले अश्रू आवरू शकला नाही. रुचिताला निरोप देताना तो तिला घट्ट मिठी मारून रडताना दिसला.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'ते एक टक्काही गेमसाठी नव्हतं', Bigg Boss मधून जाता जाता रुचिताने अखेर तिचा खरा चेहरा दाखवला
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement