advertisement

Pune Accident: भरधाव टेम्पो सिंहगड घाटातील 150 फूट खोल दरीत कोसळला; आतील चौघांनी मारल्या उड्या अन्...काळजाचा थरकाप उडवणारी घटना

Last Updated:

पुण्याकडे येत असलेला एक टेम्पो नियंत्रणाबाहेर गेल्याने तब्बल दीडशे फूट खोल दरीत कोसळला. सुदैवाने, या भीषण अपघातात टेम्पोचा चक्काचूर झाला असला तरी, त्यातील चारही प्रवासी चमत्कारिकरीत्या बचावले आहेत.

सिंहगड घाटात भीषण अपघात (प्रतिकात्मक फोटो)
सिंहगड घाटात भीषण अपघात (प्रतिकात्मक फोटो)
पुणे : ऐतिहासिक सिंहगड किल्ल्याच्या घाटात शनिवारी दुपारी एकच्या सुमारास थरकाप उडवणारी घटना घडली. पुण्याकडे येत असलेला एक टेम्पो नियंत्रणाबाहेर गेल्याने तब्बल दीडशे फूट खोल दरीत कोसळला. सुदैवाने, या भीषण अपघातात टेम्पोचा चक्काचूर झाला असला तरी, त्यातील चारही प्रवासी चमत्कारिकरीत्या बचावले आहेत.
नेमकी घटना काय?
सातारा येथून आलेला टेम्पो (MH 12 BT 3568) सिंहगड घाटातून खाली उतरत होता. धारजाई चौकाजवळ असलेल्या तळई उद्यानापुढील एका धोकादायक वळणावर समोरून पर्यटकांचे वाहन आले. या वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटले आणि वाहन थेट दुभाजकाला धडकून दरीत कोसळले.
advertisement
मृत्यूच्या दाढेतून जिवंत परतले
टेम्पो दरीत जात असताना दोन जणांनी प्रसंगावधान राखून चालत्या वाहनातून बाहेर उड्या मारल्या. इतर दोघे जण टेम्पो दरीत एका झाडाजवळ अडकला असताना बाहेर पडले. या थरारामुळे पर्यटकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. अपघातात चारही जण किरकोळ जखमी झाले असून टेम्पोचा मात्र चक्काचूर झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच हवेली आपत्ती व्यवस्थापन पथकाचे तानाजी भोसले, वनविभागाचे समाधान पाटील आणि पोलीस पाटील घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पर्यटकांच्या गर्दीमुळे घाटात वाहन चालवताना अत्यंत काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मात्र, या इतक्या भीषण अपघातात आतील प्रवासी ज्या पद्धतीने बचावले, त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Accident: भरधाव टेम्पो सिंहगड घाटातील 150 फूट खोल दरीत कोसळला; आतील चौघांनी मारल्या उड्या अन्...काळजाचा थरकाप उडवणारी घटना
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement