अबब... 25 मिनिटांच्या प्रवासाला अडीच तास, पुणे-सोलापूर महामार्गावर धोका वाढला, काय घडतंय?

Last Updated:

Pune Solapur Highway: सध्या या मार्गावरून जाण्यास दोन ते अडीच तास लागत आहेत. रुग्णवाहिका आणि इतर चारचाकी वाहनांसाठी ही परिस्थिती विशेषत अडचणीची ठरत आहे.

अबब... 25 मिनिटांच्या प्रवासाला अडीच तास, पुणे-सोलापूर महामार्गावर धोका वाढला, काय घडतंय?
अबब... 25 मिनिटांच्या प्रवासाला अडीच तास, पुणे-सोलापूर महामार्गावर धोका वाढला, काय घडतंय?
पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती ते उरुळी कांचन परिसरात नागरिकांना प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावर बेशिस्त पार्किंग, तुटलेली संरक्षक लोखंडी जाळी आणि महामार्गाच्या मधोमध लावलेले अनधिकृत जाहिरातीचे फ्लेक्स यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. या सगळ्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. काही मिनिटांच्या प्रवासाला तासभर लागत आहे.
वाहतूक कोंडीचा आणि अपघाताचा धोका
लोणी स्टेशन चौक परिसरात महामार्गावर हॉटेलसमोर वाहने धोकादायक पद्धतीने उभी केली जातात. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं. या परिसरातील नागरिकांनी या गाड्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच परिसरात नर्सरी, सिमेंट पाइप तयार करणाऱ्या कंपन्या आणि इतर उद्योग असल्यामुळे येथे अवजड वाहने सतत ये-जा करत असतात. या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली असून अपघाताचा धोका देखील वाढला आहे. प्रशासनाने यावर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
advertisement
25 मिनिटांच्या प्रवासाला 2 तास
हडपसर ते उरुळी कांचनचा प्रवास आधी 20–25 मिनिटांत पार होऊ शकायचा, मात्र सध्या या मार्गावरून जाण्यास दोन ते अडीच तास लागत आहेत. रुग्णवाहिका आणि इतर चारचाकी वाहनांसाठी ही परिस्थिती विशेषत: अडचणीची ठरत आहे. हडपसरपासून मांजरी, कदमवाकवस्ती, लोणी, थेऊर फाटा, कुंजीरवाडी, उरुळीकांचन आणि खेडेकरमळा या भागांत वाहनधारकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
अबब... 25 मिनिटांच्या प्रवासाला अडीच तास, पुणे-सोलापूर महामार्गावर धोका वाढला, काय घडतंय?
Next Article
advertisement
Minister PS Raid: ४ घरं, ३ कोटींचे दागिने, कोटींची लक्झरी कार, मंत्र्यांच्या सचिवांच्या ठिकाणांवर धाड, घबाडात काय सापडलं?
कोटींचे दागिने, महागडी लक्झरी कार, मंत्र्यांच्या सचिवांच्या ठिकाणांवर छापे, घबाड
  • ४ घरं, ३ कोटींचे दागिने, कोटींची लक्झरी कार, मंत्र्यांच्या सचिवां ठिकाणांवर धाड,

  • ४ घरं, ३ कोटींचे दागिने, कोटींची लक्झरी कार, मंत्र्यांच्या सचिवां ठिकाणांवर धाड,

  • ४ घरं, ३ कोटींचे दागिने, कोटींची लक्झरी कार, मंत्र्यांच्या सचिवां ठिकाणांवर धाड,

View All
advertisement