पुणेकरांची 'लाईफलाईन' निवडणूक ड्युटीवर! हे दोन दिवस 1150 पीएमपी बस धावणार नाहीत; आताच करा प्रवासाचं नियोजन
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
निवडणूक आयोगाचे कर्मचारी, ईव्हीएम (EVM) मशीन आणि इतर निवडणूक साहित्य मतदान केंद्रांवर पोहोचवण्यासाठी मोठ्या संख्येने वाहनांची गरज असते. यासाठी पीएमपी प्रशासनाने आपल्या ताफ्यातील बहुतांश बस निवडणूक ड्युटीसाठी देण्याचे निश्चित केले आहे.
पुणे: आगामी महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा मोठा फटका पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील दैनंदिन प्रवाशांना बसणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी दोन्ही महापालिकांनी पीएमपीच्या (PMPML) तब्बल ११५० बस दोन दिवसांसाठी आरक्षित केल्या आहेत. यामुळे रस्त्यावर धावणाऱ्या बसची संख्या निम्म्याहून अधिक घटणारआहे. परिणामी प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.
नेमका काय आहे निर्णय?
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. निवडणूक आयोगाचे कर्मचारी, ईव्हीएम (EVM) मशीन आणि इतर निवडणूक साहित्य मतदान केंद्रांवर पोहोचवण्यासाठी मोठ्या संख्येने वाहनांची गरज असते. यासाठी पीएमपी प्रशासनाने आपल्या ताफ्यातील बहुतांश बस निवडणूक ड्युटीसाठी देण्याचे निश्चित केले आहे.
प्रवाशांना फटका कधी बसणार?
१४ जानेवारी (बुधवार): मतदानाच्या आदल्या दिवशी सर्व साहित्य केंद्रांवर रवाना करण्यासाठी सर्वाधिक बसची गरज असते. त्यामुळे बुधवारी बससेवेचा सर्वाधिक तुटवडा जाणवेल.
advertisement
१५ जानेवारी (गुरुवार): मतदानाच्या दिवशीही या बस राखीव असतील, त्यामुळे नोकरी आणि व्यवसायासाठी बाहेर पडणाऱ्या पुणेकरांची गैरसोय होईल.
पीएमपीच्या ताफ्यात सध्या रस्त्यावर धावणाऱ्या एकूण १७५० बस आहेत. यातील ११५० बस निवडणुकीसाठी आरक्षित केल्या गेल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांसाठी केवळ ६०० बस शिल्लक राहणार आहेत.
पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांनी सांगितले की, "निवडणुकीच्या राष्ट्रीय कामासाठी महापालिकांनी बसची मागणी केली आहे. नियमानुसार त्या उपलब्ध करून दिल्या जातील. मात्र, प्रवाशांची गैरसोय कमीत कमी व्हावी यासाठी आमचे नियोजन सुरू असून, शक्य तितक्या बस मार्गावर ठेवण्याचा आमचा प्रयत्न असेल."
advertisement
ज्या मार्गांवर बसची संख्या कमी आहे, तेथील प्रवाशांनी १४ आणि १५ जानेवारी रोजी प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था (उदा. रिक्षा, मेट्रो किंवा खाजगी वाहने) पाहणे हिताचे ठरेल. विशेषतः शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाने वेळेचे नियोजन करावे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 25, 2025 9:31 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुणेकरांची 'लाईफलाईन' निवडणूक ड्युटीवर! हे दोन दिवस 1150 पीएमपी बस धावणार नाहीत; आताच करा प्रवासाचं नियोजन










