'माझी निशा मला मिठी मारेल', मुलीचा विरह जिव्हारी, अंत्यसंस्कारानंतरही बाप 2 दिवस स्मशानात, मन हेलावणारी घटना!

Last Updated:

ठाण्यातील एका हतबल पित्याने आपल्या मुलीच्या अंत्यसंस्कारानंतर तब्बल दोन दिवस स्मशानातच घालवले.

AI generated Photo
AI generated Photo
ठाणे जिल्ह्याच्या दिवा परिसरात मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. इथं कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या ५ वर्षांच्या चिमुरडीनं महिनाभराच्या झुंजीनंतर प्राण सोडले. पण, आपल्या काळजाचा तुकडा आपल्याला सोडून जाऊच शकत नाही, ती परत येईन, या आशेपोटी एका हतबल पित्याने आपल्या मुलीच्या अंत्यसंस्कारानंतर तब्बल दोन दिवस स्मशानातच घालवले. "माझी निशा उठेल आणि मला हाक मारेल," या आशेने विमनस्क अवस्थेत ते स्मशानाबाहेर बसले होते. बापाची ही अवस्था पाहून नातेवाईकांचेही डोळे पाणावलं.

नेमकी काय आहे घटना?

दिवा पूर्वेकडील बेडेकरनगर परिसरातील नथुराम शिंदे यांची पाच वर्षांची मुलगी निशा ही घराबाहेर खेळत असताना तिला एका पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला होता. तिला तातडीने डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिला रेबीजचे तीन डोस देण्यात आले. मात्र, चौथ्या डोसच्या वेळी तिची प्रकृती कमालीची बिघडली. तिला रेबीजची लागण झाल्याने ती कुत्र्यासारखे आवाज काढू लागली आणि स्वतःलाच चावे घेऊ लागली. अखेर मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू असताना २१ डिसेंबर रोजी तिची प्राणज्योत मालवली.
advertisement

स्मशानातील तो काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग

निशाच्या मृत्यूनंतर मुंबईतच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधी आटोपल्यानंतर नातेवाईक घराकडे निघाले. नथुराम शिंदे यांनी "मी कागदपत्रे घेऊन येतो" असे सांगितले, मात्र ते परतलेच नाहीत. नातेवाईकांनी दिवा स्थानकावर आणि सर्वत्र त्यांची शोधाशोध केली, पण नथुराम कुठेच सापडले नाहीत.
दोन दिवस उलटूनही नथुराम यांचा शोध न लागल्याने नातेवाईक पुन्हा स्मशानाकडे गेले. तिथे जे दृश्य दिसले ते पाहून सर्वांचे काळजात चर्र झाले. नथुराम हे मुलीवर जिथे अंत्यसंस्कार केले होते, त्या जागेजवळ विमनस्क अवस्थेत बसून होते. आपली लाडकी निशा पुन्हा उठेल आणि आपल्याला मिठी मारेल, या आशेने ते दोन दिवस तिथेच बसून तिची वाट पाहत होते.
advertisement

नातेवाइकांना फुटला टाहो

या प्रकारानंतर नातेवाईकांनी नथुराम यांना कसेबसे समजावून घरी आणले. पोटच्या गोळ्याला गमावण्याचे दुःख किती अथांग असू शकते, याची प्रचिती या घटनेने संपूर्ण परिसराला आली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'माझी निशा मला मिठी मारेल', मुलीचा विरह जिव्हारी, अंत्यसंस्कारानंतरही बाप 2 दिवस स्मशानात, मन हेलावणारी घटना!
Next Article
advertisement
CM Devendra Fadnavis On Thackeray Alliance:  ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी शाल...'
ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श
  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

View All
advertisement