Astrology: जरा नव्हे 7 वर्षे भयंकर त्रास-अडचणींचा काळ पाहिला! शनिच्या राशीची परीक्षा आता संपणार
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Astrology: साडेसात वर्षांची साडेसाती संपवून शनिची राशी असलेली कुंभ रास लवकरच मुक्त होण्याच्या मार्गावर आहे. या राशींच्या लोकांसाठी लवकरच संकटाचे दिवस संपणार आहेत. सध्या मेष, कुंभ आणि मीन राशीवर शनीची साडेसाती सुरू आहे. यामध्ये सर्वात आधी कुंभ राशीवरील साडेसातीचा प्रभाव संपेल.साडेसातीच्या प्रभावातून बाहेर येताच कुंभ राशीच्या व्यक्तींची कामे वेगाने पूर्ण होतील. धनधान्याच्या बाबतीत येणारे अडथळे दूर होतील. करिअरमध्ये प्रगती होईल आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. जाणून घेऊया कुंभ राशीवरील शनीची साडेसाती कधी संपणार आहे.
हिंदू पंचांगानुसार, सध्या शनी मीन राशीत विराजमान आहे. 3 जून 2027 रोजी जेव्हा शनी मीन राशीतून बाहेर पडून मेष राशीत प्रवेश करेल, तेव्हा कुंभ राशीवर अनेक वर्षांपासून सुरू असलेली साडेसाती संपेल. मात्र, 20 ऑक्टोबर 2027 रोजी शनी पुन्हा मीन राशीत येईल, तेव्हा कुंभ राशीवर पुन्हा साडेसातीचा काळ सुरू होईल. परंतु या अल्पकालीन साडेसातीचा परिणाम अत्यंत सौम्य असेल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मानसिक शांतता - साडेसातीचा प्रभाव संपताच तुम्हाला तणाव, भ्रम आणि मोठ्या चिंतेतून मुक्ती मिळू शकते. घर आणि कुटुंबात आनंदाचे आगमन होईल. नात्यात गोडवा येईल. वैवाहिक जीवनातील मतभेद संपतील. कोर्ट-कचेरीशी संबंधित प्रकरणे तुमच्या बाजूने लागतील. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. नातेवाईकांचे पूर्ण सहकार्य लाभेल.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)









