5 मिनिटांची भेट अन् आईने हातावर ठेवला तो गोड पदार्थ, इमोशनल झाला सिद्धार्थ चांदेकर; VIDEO व्हायरल
- Published by:Minal Gurav
Last Updated:
सिद्धार्थ चांदेकर सध्या क्रांतिज्योती मराठी माध्यम आणि मिसेस देशपांडे या कलाकृतींमुळे चर्चेत आहे. दरम्यान सिद्धार्थ चांदेकरने आई सीमा चांदेकरसोबतचा इमोशनल व्हिडीओ शेअर केला.
अभिनेत सिद्धार्थ चांदेकरचा क्रांतिज्योती मराठी माध्यम हा सिनेमा 1 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याचबरोबर त्याची मिसेस देशपांडे ही सीरिज देखील प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या सीरिजमध्ये त्यानं अभिनेत्री माधुरी दीक्षितबरोबर स्क्रिन शेअर केली आहे. माधुरीच्या ऑनस्क्रिन मुलाची भूमिका सिद्धार्थनं केली आहे. सिद्धार्थ चांदेकरला माधुरी दीक्षितबरोबर पाहून प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे. एकीकडे ऑनस्क्रिन आई माधुरी दीक्षितबरोबर सिद्धार्थच्या केमिस्ट्रीची चर्चा होत असताना दुसरीकडे सिद्धार्थ त्याच्या रिअल लाईफ आईसोबत दिसला. सिद्धार्थने त्याच्या आईचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. सिद्धार्थचा हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं आहे.
सिद्धार्थ सध्या त्याच्या आगामी क्रांतीज्योती मराठी माध्यम या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. बिझी शेड्यूलमधून वेळ काढून तो त्याच्या आईला भेटला. त्याची आई त्याच्यासाठी वेळ काढून धावत पळत त्याला भेटायला आली. पाच मिनिटांसाठी भेटायला आलेल्या आईनं सिद्धार्थच्या हातावर एक खास पदार्थ ठेवला. तो पदार्थ पाहून सिद्धार्थ खूपच इमोशनल झाला. सिद्धार्थनं व्हिडीओ शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्यात.
advertisement
सिद्धार्थनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय की सिद्धार्थला भेटण्यासाठी त्याची आई घाई घाईनं येतेय. सिद्धार्थनं व्हिडीओमध्ये लिहिलंय, काल अगदी 5 मिनिटांसाठी आई धावत धावत मला भेटायला आली. गूळ तूप पोळीचा लाडू घेऊन. शाळेत जाताना आईने प्रेमाने बनवून दिलेला डबा आठवला. आईने दिलेली ही गोड भेट पाहून सिद्धार्थ इमोशनल झाला.
advertisement
सिद्धार्थला आईला भेटून शाळेचे दिवस आठवले. त्याने पोस्टमध्ये लिहिलंय, शाळेच्या gathering ला आपण स्टेज वर नाचत असताना खाली प्रेक्षकांमध्ये आई दिसली की कसा आनंद व्हायचा! तसा अजूनही होतो! सिद्धार्थ आणि सिद्धार्थच्या आईमध्ये असलेलं प्रेम, त्यांचं बॉन्डिंग हे सगळं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं.
सिद्धार्थचा व्हिडीओ पाहून त्याने फॅन्स देखील इमोशनल झालेत. अनेक कलाकारांनी आणि फॅन्सनी सिद्धार्थच्या फोटोवर हार्ट इमोजी शेअर करत कमेंट्स केल्या आहेत.
advertisement
advertisement
सिद्धार्थच्या आईचं नाव सीमा चांदेकर असून त्या देखील उत्कृष्ट अभिनेत्री आहेत. अनेक मराठी नाटकं, सिनेमा आणि मालिकांमध्ये त्यांनी काम केलं आहे. सिद्धार्थ आणि त्याची पत्नी मिलाती मयेकर यांनी काही वर्षांआधीच त्याच्या आईचं दुसरं लग्न लावून दिलं. सीमा यांच्या दुसऱ्या लग्नाची खूप चर्चा झाली होती. सिद्धार्थनं आईसाठी घेतलेल्या या निर्णयाचं सगळ्यांनी खूप कौतुक केलं होतं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 25, 2025 8:01 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
5 मिनिटांची भेट अन् आईने हातावर ठेवला तो गोड पदार्थ, इमोशनल झाला सिद्धार्थ चांदेकर; VIDEO व्हायरल











