हायवेवर अग्नितांडव, गोकर्णला जाणाऱ्या बसला भीषण अपघात, गाढ झोपलेल्या 17 जणांचा कोळसा
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर हिरियुर तालुक्यातील गोरलट्टू गावाजवळ एक भीषण रस्ता अपघात झाला आहे. ज्यामध्ये एका बसला आग लागून 17 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे.
चित्रदुर्ग: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर हिरियुर तालुक्यातील गोरलट्टू गावाजवळ एक भीषण रस्ता अपघात झाला आहे. ज्यामध्ये एका बसला आग लागून 17 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे. ही खासगी बस बेंगळुरूहून गोकर्णाकडे जात होती. दरम्यान, रात्री उशिरा विरुद्ध दिशेनं येणारी एक लॉरी डिव्हायडर ओलांडून दुसऱ्या लेनमध्ये घुसली. याच वेळी समोरून येणाऱ्या या बसला लॉरीची जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की बसने लगेचच पेट घेतला.
या भीषण अपघातात गाढ झोपलेल्या दहा जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. तर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तातडीने हिरियुर आणि चित्रदुर्ग जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हिरियुरहून बेंगळुरूकडे जाणारी लॉरी रस्ता दुभाजक ओलांडून दुसऱ्या लेनमध्ये घुसली आणि बसशी धडकली, ज्यामुळे हा दुर्दैवी अपघात झाला.
advertisement
VIDEO | Chitradurga, Karnataka: Over 10 people are feared dead in a lorry-bus collision on National Highway 48 near Gorlathu village in Hiriyur taluk.
The bus, travelling from Bengaluru to Shivamogga, caught fire following the crash. Nine passengers reportedly escaped unhurt,… pic.twitter.com/dj75qIiIws
— Press Trust of India (@PTI_News) December 25, 2025
advertisement
या अपघातानंतर नऊ जणांनी सुखरुप बसमधून स्वत:ची सुटका केली. मात्र हा सगळा प्रकार इतक्या कमी वेळात घडला की, इतर प्रवाशांना आपला जीव वाचवता आला नाही. यातील काहीजण गाढ झोपेत होते. त्यामुळे त्यांना काही कळेपर्यंत हायवेवर अग्नितांडव झाला. जखमींमधील काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. हा अपघात पहाटे दोनच्या सुमारास झाला आहे.
view commentsLocation :
Bangalore Rural,Karnataka
First Published :
Dec 25, 2025 7:52 AM IST
मराठी बातम्या/देश/
हायवेवर अग्नितांडव, गोकर्णला जाणाऱ्या बसला भीषण अपघात, गाढ झोपलेल्या 17 जणांचा कोळसा










