Shiv Sena UBT Candidate List: नव्या चेहऱ्यांसाठी ठाकरे आग्रही, पण जुन्या शिलेदारांचा मुलं-सुनांसाठी आग्रह, उमेदवारीवरून मातोश्रीची डोकेदुखी वाढली

Last Updated:

Shiv Sena UBT BMC Election Candidate List: उमेदवारीवरून शिवसेना ठाकरे गटात मतभेद होण्याची शक्यता आहे. नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला असताना दुसरीकडे मात्र ठाकरेंच्या जुन्या शिलेदारांनी आपली मुलं-नातलगांसाठी जोर लावण्यास सुरुवात केली आहे.

नव्या चेहऱ्यांसाठी ठाकरे आग्रही, पण जुन्या शिलेदारांचा मुलं-सुनांसाठी आग्रह, उमेदवारीवरून मातोश्रीची डोकेदुखी वाढली
नव्या चेहऱ्यांसाठी ठाकरे आग्रही, पण जुन्या शिलेदारांचा मुलं-सुनांसाठी आग्रह, उमेदवारीवरून मातोश्रीची डोकेदुखी वाढली
सुमित सावंत, प्रतिनिधी, मुंबई: शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीची घोषणा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी केली. जागा वाटपाचा फॉर्म्युला बुधवारच्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आला नाही. मात्र, आता उमेदवारीवरून शिवसेना ठाकरे गटात मतभेद होण्याची शक्यता आहे. नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला असताना दुसरीकडे मात्र ठाकरेंच्या जुन्या शिलेदारांनी आपली मुलं-नातलगांसाठी जोर लावण्यास सुरुवात केली आहे. तर, दुसरीकडे तरुण, अनुभवी शिवसैनिकांनीदेखील उमेदवारी मागितली आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) नेतृत्वाकडून “नव्या आणि तरुण कार्यकर्त्यांना संधी” देण्याचा निर्धार वारंवार व्यक्त केला जात असला, तरी प्रत्यक्षात मात्र नातलगांना उमेदवारी मिळवून देण्यासाठीच पक्षातील वरिष्ठ नेत्यांची धावपळ सुरू असल्याचे चित्र समोर येत आहे. २०१७ नंतर आता होऊ घातलेल्या या महत्त्वाच्या निवडणुकीत अनेक निष्ठावान कार्यकर्ते उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. मात्र, पक्षातील काही बड्या नेत्यांकडून भाऊ, पत्नी, मुलगा-मुलगी आणि सून यांच्यासाठी लॉबिंग सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
advertisement
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. तर, दुसरीकडे अद्यापही शिवसेना ठाकरे गटासह कोणत्याही राजकीय पक्षाने उमेदवार जाहीर केले नाहीत. प्रत्येक प्रभागात इच्छुकांची संख्या वाढली आहे. विशेषतः गेल्या अनेक वर्षांपासून संघटनात्मक काम करणारे कार्यकर्ते यावेळी संधी मिळेल या अपेक्षेने तयारीला लागले आहेत. मात्र, उमेदवारीच्या चर्चांमध्ये कार्यकर्त्यांपेक्षा ‘घरातीलच’ नावांना प्राधान्य दिले जात असल्याची कुजबुज पक्षातच सुरू आहे.
advertisement

कोणी मुलांसाठी, कोणी सुनेसाठी मागतोय उमेदवारी...

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी खासदार विनायक राऊत हे वाकोल्यातून आपल्या मुलगा किंवा मुलीसाठी उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. माजी आमदार विनोद घोसाळकर हे दहिसर मतदारसंघातून आपली धाकटी सून पूजा घोसाळकर यांच्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले जाते.तर ईशान्य मुंबईचे खासदार संजय पाटील हे भांडुपमधून आपल्या मुलीसाठी उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
advertisement
त्याच बरोबर माजी महापौर आणि ठाकरे गटाचे प्रतोद आमदार सुनील प्रभू हे गोरेगाव-दिंडोशीतून आपल्या मुलासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. शिवसेनेचे आमदार अजय चौधरी हे परळ-शिवडीमधून आपल्या सुनेच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. वरळीतील एका मोठ्या नेत्याने आपल्या मुलीसाठी वरळी प्रभागावर दावा केल्याचीही माहिती समोर आली आहे. आमदार सुनील शिंदे यांचे बंधूदेखील वरळी-प्रभादेवीमधून उमेदवारीसाठी जोर लावत असल्याची माहिती आहे.
advertisement
माजी महापौर श्रद्धा जाधव यादेखील शिवडी-नायगांव भागातून आपल्या मुलासाठी इच्छुक आहेत. तर, माजी आमदार दगडू सकपाळ हे लालबागमधून आपल्या मुलीसाठी उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा पक्षाच्या वर्तुळात रंगली आहे.

मातोश्रीची डोकेदुखी वाढली...

एकीकडे ठाकरे गटाकडून ‘नव्या नेतृत्वाला संधी’ देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, दुसरीकडे नेते, आमदारांकडून आपल्या घरातील सदस्यांसाठी प्रयत्न केले जात आहेत. शिंदे यांनी पक्ष फोडल्यानंतरही या नेत्यांनी ठाकरेंना साथ दिली. तर, दुसरीकडे कठीण काळात पक्षासाठी जीव ओतून काम करणारे शिवसैनिक उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे उमेदवारी देताना मातोश्री काय निर्णय देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Shiv Sena UBT Candidate List: नव्या चेहऱ्यांसाठी ठाकरे आग्रही, पण जुन्या शिलेदारांचा मुलं-सुनांसाठी आग्रह, उमेदवारीवरून मातोश्रीची डोकेदुखी वाढली
Next Article
advertisement
CM Devendra Fadnavis On Thackeray Alliance:  ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी शाल...'
ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श
  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

View All
advertisement