Healthy Cooking Oil : हॉट प्रेस्ड आणि कोल्ड प्रेस्ड ऑईलमध्ये फरक काय? दोन्हींपैकी कोणतं तेल जास्त फायदेशीर?
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Difference between cold-pressed and hot-pressed oil : आजकाल हेल्दी लाइफस्टाइलकडे लोकांचा कल वाढत असून स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या तेलाकडेही विशेष लक्ष दिलं जातं. बाजारात सहज मिळणाऱ्या तेलांबरोबरच 'कोल्ड प्रेस्ड' आणि 'हॉट प्रेस्ड' तेलांची चर्चा मोठ्या प्रमाणात होताना दिसते. मात्र अनेकांना या दोन्ही तेलांमधला नेमका फरक काय आहे, कोणतं तेल जास्त आरोग्यदायी आहे, हे माहिती नसतं. त्यामुळे योग्य निवड करण्यासाठी कोल्ड प्रेस्ड आणि हॉट प्रेस्ड तेलांमधला फरक समजून घेणं गरजेचं आहे.
कोल्ड प्रेस्ड तेलाची प्रक्रिया पारंपरिक आणि नैसर्गिक पद्धतीने केली जाते. शेंगदाणा, तीळ, सूर्यफूल, ऑलिव्ह, सोयाबीन, बदाम अशा बियांना अतिशय कमी तापमानावर हळूहळू प्रेस करून त्यातून तेल काढलं जातं. या प्रक्रियेत उष्णतेचा वापर अत्यल्प असल्यामुळे तेलातील नैसर्गिक गुणधर्म जसेच्या तसे टिकून राहतात. त्यामुळे हे तेल साध्या तेलांच्या तुलनेत थोडं महाग असतं.
advertisement
advertisement
याच्या उलट हॉट प्रेस्ड तेल काढण्यासाठी बियांना उच्च तापमानावर गरम केलं जातं. हायड्रॉलिक प्रेसच्या साहाय्याने बियांवर दाब टाकून जलद आणि मोठ्या प्रमाणात तेल काढण्यात येतं. त्यानंतर हे तेल फिल्टर करून बाजारात विक्रीसाठी पाठवलं जातं. ही प्रक्रिया जलद आणि स्वस्त असल्यामुळे हॉट प्रेस्ड तेल सहज उपलब्ध होतं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement








