Minister PS Raid: ४ घरं, ३ कोटींचे दागिने, कोटींची लक्झरी कार, मंत्र्यांच्या सचिवांच्या ठिकाणांवर धाड, घबाडात काय सापडलं?
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Raid On Minister PA: मंत्र्यांच्या पीएशी संबंधित ठिकाणी एकाच वेळी छापेमारी केली. या कारवाईत लोकायुक्त पोलिसांना मोठं घबाड सापडलं आहे.
बेंगळुरू : बुधवारी एका मोठ्या कारवाईत, कर्नाटक लोकायुक्त पोलिसांनी राज्याचे गृहनिर्माण आणि अल्पसंख्याक कल्याण मंत्री बी. जमीर अहमद खान यांचे वैयक्तिक सचिव सरदार सरफराज खान यांच्याशी संबंधित ठिकाणी एकाच वेळी छापेमारी केली. या कारवाईत लोकायुक्त पोलिसांना मोठं घबाड सापडलं आहे.
ही कारवाई बेकायदेशीर मालमत्ता प्रकरणाच्या चालू चौकशीचा भाग म्हणून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सरफराज खान हे सहकारी संस्था लेखापरीक्षण विभागात कायमचे संचालक म्हणून तैनात आहेत, परंतु सध्या ते प्रतिनियुक्तीवर मंत्र्यांचे वैयक्तिक सचिव म्हणून काम करत आहेत.
बुधवार सकाळी सुरू झालेल्या छाप्यादरम्यान, लोकायुक्त पथकांनी सरफराज खानशी संबंधित १३ ठिकाणी झडती घेतली. यामध्ये त्यांचे बेंगळुरूतील हलासुर येथील निवासस्थान आणि कोडगु आणि म्हैसूरमधील अनेक मालमत्तांचा समावेश आहे.
advertisement
१४.३८ कोटी रुपयांची मालमत्ता?
लोकायुक्त अधिकाऱ्यांच्या मते, छाप्यांमध्ये अंदाजे १४.३८ कोटी रुपयांची संशयास्पद मालमत्ता आढळून आली. यामध्ये ८.४४ कोटी रुपयांची स्थावर मालमत्तेचा समावेश असून ४ घरांची कागदपत्रे सापडली आहेत. त्याशिवाय,
३७ एकर शेती जमीन, सुमारे ३ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आढळून आले आहेत. त्याशिवाय, ६६,५०० रुपये रोख रक्कम, १.६४ कोटी रुपयांच्या लक्झरी कार सापडल्या आहेत. त्याशिवाय, १.२९ कोटी रुपयांच्या बँक ठेवी आणि इतर गुंतवणुकीशी संबंधित कागदपत्रे आढळून आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
advertisement
अधिकाऱ्यांनी सांगितले की, की बेकायदेशीर मालमत्तेचे संपूर्ण नेटवर्क उघड करण्यासाठी जप्त केलेल्या कागदपत्रांची आणि व्यवसायाच्या नोंदींची सखोल चौकशी सुरू आहे.
व्यावसायिक ठिकाणेदेखील रडारवर...
बागलकोटमधील लोकायुक्त पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या आधारे तपास केला जात आहे. तपास मोहिमेदरम्यान दोन कॉफी इस्टेट (कोडागु) आणि एक रिसॉर्ट (एचडी कोटे, म्हैसूर) देखील छापे टाकण्यात आले.
advertisement
सफराझ खान यांच्या विविध उच्चपदस्थ पदांवर आणि त्यांच्या संपत्तीमधील संभाव्य संबंधांची चौकशी करण्यासाठी लोकायुक्त पथक जप्त केलेल्या कागदपत्रांची तपासणी करत आहे. येत्या काही दिवसांत या प्रकरणी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 25, 2025 10:40 AM IST
मराठी बातम्या/देश/
Minister PS Raid: ४ घरं, ३ कोटींचे दागिने, कोटींची लक्झरी कार, मंत्र्यांच्या सचिवांच्या ठिकाणांवर धाड, घबाडात काय सापडलं?









