आईने 75 हजार पाठवले, पुण्यातल्या मुलाला शंका आली, घरी फोन केला तर सगळं संपलं, छ. संभाजीनगर हळहळलं
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये एका शिक्षिकेनं पुण्यात शिक्षण घेणाऱ्या मुलाला 75 हजार रुयपे पाठवले. मुलानं मेसेज पाहून वडिलांना फोन केला.
छत्रपती संभाजीनगर : पुण्यात शिक्षण घेत असलेल्या मुलाच्या खात्यावर 75 हजार रुपये पाठवून कन्नड शहरातील एका शिक्षिकेने टोकाचं पाऊल उचललं. ही हृदयद्रावक घटना बुधवारी (24 डिसेंबर) सकाळी उघडकीस आली. श्रीराम कॉलनी येथे राहणाऱ्या वैशाली तायडे-शेलार (वय 47) यांनी राहत्या घरी गळफास घेत आपला जीवनप्रवास संपवला.
आईकडून अचानक मोठी रक्कम खात्यात जमा झाल्याचा मेसेज मिळताच मुलगा अस्वस्थ झाला. त्याने तात्काळ वडिलांना फोन करून आईबद्दल चौकशी केली आणि घरी जाण्याची विनंती केली. काही वेळातच राजेश शेलार घरी पोहोचले. मात्र घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे दिसून आले. दरवाजा उघडल्यावर समोर आलेले दृश्य काळीज पिळवटून टाकणारे होते. वैशाली या छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्या. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
advertisement
वैशाली व राजेश शेलार हे दोघेही मेहगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच सहायक फौजदार नासेर पठाण, पोलिस कॉन्स्टेबल सतीश नरोडे, नामदेव गाडेकर यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. वैशाली यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पुढील तपास कन्नडचे सहायक फौजदार पठाण करीत आहेत. वैशाली यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, जावई, नातू असा परिवार आहे.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Dec 25, 2025 10:26 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
आईने 75 हजार पाठवले, पुण्यातल्या मुलाला शंका आली, घरी फोन केला तर सगळं संपलं, छ. संभाजीनगर हळहळलं







