'लव्ह मॅरेज'नंतर डॉक्टर महिलेची ‘ती’ डिमांड, दुसऱ्याच दिवशी बिनसलं, 8 दिवसांत घटस्फोट, पुण्यात काय घडलं?

Last Updated:

Love Marriage: सध्याच्या काळात प्रेम विवाहानंतर देखील घटस्फोटाचं प्रमाण वाढत असल्याचं चित्र आहे. पुण्यात लव्ह मॅरेजनंतर दुसऱ्याच दिवशी जोडपं वेगळं झालं.

लव्ह मॅरेजनंतर डॉक्टर महिलेची ‘ती’ डिमांड, दुसऱ्याच दिवशी बिनसलं, 8 दिवसांत घटस्फोट, पुण्यात काय घडलं? (Ai Photo)
लव्ह मॅरेजनंतर डॉक्टर महिलेची ‘ती’ डिमांड, दुसऱ्याच दिवशी बिनसलं, 8 दिवसांत घटस्फोट, पुण्यात काय घडलं? (Ai Photo)
पुणे : गेल्या काही वर्षांपासून घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अगदी किरकोळ कारणांवरून पती-पत्नी विभक्त होण्याच्या घटनाही वाढताना दिसत आहेत. अशीच एक घटना पुण्यातून समोर आली आहे. पुण्यातील एका उच्चशिक्षित दाम्पत्याचा प्रेमविवाह झाला होता. प्रेमविवाह असल्याने एकमेकांच्या आवडी-निवडी आधीच माहीत असल्यामुळे संसार सुखाचा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात झालं उलटं. लग्नाच्या दुसऱ्याच दिवसापासून दोघांमध्ये वाद सुरू झाले आणि ते वेगळे राहू लागले. अखेर अवघ्या आठ दिवसांत या दाम्पत्याचा घटस्फोट मंजूर झाला. कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश बी. डी. कदम यांनी हा निकाल दिला आहे.
फक्त 8 दिवसांत घटस्फोट मंजूर
घटस्फोट झालेले दोघेही उच्चशिक्षित असून पती शिपवर काम करतो, तर पत्नी डॉक्टर आहे. 3 डिसेंबरला कौटुंबिक न्यायालयात दाखल करण्यात आलेला परस्पर संमतीने घटस्फोटाचा अर्ज 10 डिसेंबरला निकाली निघाला. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, पती-पत्नी 18 महिन्यांहून अधिक काळ वेगळे राहत असल्यास घटस्फोटासाठी आवश्यक असलेला सहा महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी वगळता येतो. संबंधित प्रकरणात दाम्पत्य मागील 18 महिन्यांपासून वेगळे राहत असल्याने हा कालावधी माफ करण्याची मागणी करण्यात आली होती. न्यायालयाने ती मागणी मान्य करत घटस्फोट मंजूर केला. या प्रकरणात दाम्पत्याने अ‍ॅड. राणी कांबळे-सोनावणे यांच्यामार्फत कौटुंबिक न्यायालयात परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता.
advertisement
लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी वाद
सुमारे 18 महिन्यांपूर्वी या दाम्पत्याचा प्रेमविवाह झाला होता. मात्र, विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी पतीच्या शिपवरील कामावर जाण्याच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाले. त्यानंतर दोघे वेगळे राहू लागले. कुटुंबीयांनी दोघांमधील वाद मिटवण्याचे प्रयत्न केले. मात्र, ते अपयशी ठरले. विवाहानंतर सुरू झालेला तणाव कायम राहिल्याने पुन्हा एकत्र येणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले. अखेर दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. पतीला शिपवरील कामासाठी तातडीने जाणे आवश्यक असल्याने घटस्फोटासाठी दाखल केलेला अर्ज न्यायालयाने लवकर निकाली काढला. परस्पर संमतीने दाखल केलेल्या घटस्फोटाच्या अर्जाला न्यायालयाने मंजुरी दिली असल्याची माहिती अ‍ॅड. राणी कांबळे-सोनावणे यांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
'लव्ह मॅरेज'नंतर डॉक्टर महिलेची ‘ती’ डिमांड, दुसऱ्याच दिवशी बिनसलं, 8 दिवसांत घटस्फोट, पुण्यात काय घडलं?
Next Article
advertisement
CM Devendra Fadnavis On Thackeray Alliance:  ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी शाल...'
ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श
  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

  • ठाकरे बंधूंच्या युतीवर CM फडणवीसांचा पहिला वार, राज ठाकरेंवरही हल्लाबोल, 'भगवी श

View All
advertisement