advertisement

ओटीटीवरील फेमस मराठमोळी स्टार, अभिनेत्रीला पडली पिंक ट्रम्पेड झाडाची भुरळ; Video

Last Updated:

सध्या सोशल मीडियावर ओटीटी स्टार्सची चांगलीच चर्चा सुरू आहे. अशातच सध्या एका ओटीटी अभिनेत्रीच्या व्हिडिओने चाहत्यांवर भुरळ घातली आहे. त्या अभिनेत्रीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होतोय.

ओटीटीवरील फेमस मराठमोळी स्टार, अभिनेत्रीला पडली पिंक ट्रम्पेड झाडाची भुरळ; Video
ओटीटीवरील फेमस मराठमोळी स्टार, अभिनेत्रीला पडली पिंक ट्रम्पेड झाडाची भुरळ; Video
मुंबई: सध्या सोशल मीडियावर ओटीटी स्टार्सची कमालीची चर्चा सुरू आहे. मिर्झापूर वेबसीरीजमधून संपूर्ण देशात प्रसिद्ध झालेल्या श्रिया पिळगांवकरच्या एका व्हिडिओने चाहत्यांवर भुरळ घातली आहे. कायमच आपल्या निखळ सौंदर्याने चाहत्यांचे मन जिंकणाऱ्या श्रियाने इन्स्टाग्रामवर अलीकडेच एक व्हिडिओ शेअर केलेली आहे. ज्यामुळे तिच्या निखळ सौंदर्याची चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा होत आहे. श्रियाने मुंबईमध्ये पिंक ट्रम्पेड झाडांजवळ एक सुंदर व्हिडिओ शेअर केलेला आहे. सध्या पिंक ट्रम्पेड झाड सर्वत्र चर्चेचा विषय आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये ह्या झाडांना बहर येतो.
सुप्रसिद्ध मराठमोळे अभिनेते सचिन पिळगांवकर आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांची श्रिया ही लेक आहे. श्रियाने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर मराठीसह बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची छाप पाडली आहे. तिला आज कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. निखळ सौंदर्य आणि उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर श्रियाने चाहत्यांमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. सध्या इन्स्टाग्रामवर श्रियाचा मुंबईमधील एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्री पिंक ट्रम्पेड झाडाच्या खाली उभी राहून एक रील शूट केला आहे. ज्यातील तिच्या सौंदर्याचे चाहत्यांकडून कौतुक होत आहे.
advertisement
advertisement
साथिया चित्रपटातलं टायटल ट्रॅक बॅकग्राऊंड म्युझिकला लावून अभिनेत्रीने तो रील शेअर केला आहे. व्हाईट अँड पिंक कलरचा स्टायलिश वेस्टर्न ड्रेस कॅरी करत श्रियाने ही सुंदर रिल शूट केली आहे. इन्स्टाग्रामवर रील शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शन दिले की, "फुले जिथे आहेत तिथे तू मला शोधशील, मुंबईतील विक्रोळीमध्ये बहरलेले पिंक ट्रम्पेड झाडं पाहण्यासाठी गेले होते." 3 लाख 83 हजारांहून अधिक युजर्सने हा व्हिडिओ पाहिला असून 16 हजारांहून अधिक चाहत्यांनी व्हिडिओला लाईक केलेले आहे. सध्या सोशल मिडियासह सर्वत्र पिंक ट्रम्पेड झाडांची जोरदार चर्चा सुरू आहे, त्याचं कारण फेब्रुवारी महिन्यामध्ये पिंक ट्रम्पेड झाडांना खूप सुंदर बहार येतो. पिंक ट्रम्पेड झाडांजवळ फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी अनेकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
advertisement
श्रियाच्या कामाविषयी बोलायचे तर, मिर्झापूर वेबसीरीजमधून देशभरामध्ये प्रकाशझोतात आलेल्या स्वीटीचे लाखो चाहते आहेत. श्रिया आता चाहत्यांच्या भेटीला मिर्झापूर चित्रपटातून देखील येणार आहे. अलीकडेच चित्रपटाची शुटिंग संपली आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
ओटीटीवरील फेमस मराठमोळी स्टार, अभिनेत्रीला पडली पिंक ट्रम्पेड झाडाची भुरळ; Video
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement