नव्या नवरीचं भयानक कांड, पाचव्याच दिवशी केलं असं, सगळेच हैराण, बीडमध्ये खळबळ
- Reported by:Prashant Pawar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Beed Marriage Fraud: मुलीची कथित मावशी व महिला एजंटने उलट धमकी देत, पुन्हा फोन केल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा इशारा दिला.
बीड : लग्नाचे आमिष दाखवून तरुणाची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पाटोदा तालुक्यात उघडकीस आला आहे. गंडाळवाडी येथील एका तरुणाचा विवाह लावून दिल्यानंतर अवघ्या पाचव्या दिवशी नवरीने घरातून रोकड व सोन्याचे दागिने घेऊन पलायन केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नवरीसह पाच जणांविरुद्ध अंमळनेर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंडाळवाडी येथील ३४ वर्षीय संजय शामराव पवार हे विवाहासाठी स्थळ शोधत होते. याचाच गैरफायदा घेत दत्ता पवार (रा. सुपा) व पठाण (रा. चोभा निमगाव) या दोन मध्यस्थांनी त्यांना एका मुलीचे स्थळ सुचवले. पंढरपूर येथे मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्या वेळी मुलीची कथित मावशी व एका महिला एजंटने विवाहासाठी मोठ्या रकमेची मागणी केली.
advertisement
मध्यस्थांच्या सांगण्यावरून संजय पवार यांनी चार लाख रुपये रोख दिले. याशिवाय लग्नासाठी दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिनेही खरेदी करण्यात आले. १० डिसेंबर रोजी पंढरपूर येथे नोटरी पद्धतीने विवाह झाला. त्यानंतर गावी धार्मिक विधी पार पाडत विवाहाची औपचारिकता पूर्ण करण्यात आली.
advertisement
लग्नानंतर नवरी रुपाली बाळू दिशागंज (रा. लाडगाव, ता. वैजापूर) हिने सुरुवातीचे पाच दिवस सासरी नीट वागणूक दिली. मात्र, १५ डिसेंबरच्या रात्री कोणालाही काहीही न सांगता ती घरातून चार लाखांची रोकड व सोन्याचे दागिने घेऊन बेपत्ता झाली. सकाळी ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली; मात्र कोणताही ठावठिकाणा लागला नाही.
advertisement
संजय पवार यांनी मध्यस्थांना संपर्क साधला असता, त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. १७ डिसेंबर रोजी मुलीची कथित मावशी व महिला एजंटने उलट धमकी देत, पुन्हा फोन केल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा इशारा दिला. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संजय पवार यांनी पोलिसांत तक्रार दिली. या प्रकरणी दत्ता पंढरीनाथ पवार, पठाण, जयश्री रवी शिंदे, रुपाली बाळू दिशागंज व एका अनोळखी महिला एजंटविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलिस निरीक्षक भार्गव सपकाळ पुढील तपास करीत आहेत.
view commentsLocation :
Bid,Maharashtra
First Published :
Dec 24, 2025 3:23 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
नव्या नवरीचं भयानक कांड, पाचव्याच दिवशी केलं असं, सगळेच हैराण, बीडमध्ये खळबळ











