Nashik News: शेअर मार्केटमध्ये पैसे डबल? नाशिकच्या तिघांसोबत भयंकर घडलं, 17700000 रुपयांना गंडा!

Last Updated:

Nashik News: शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून दुप्पट पैसे मिळवण्याच्या नादात 1 कोटी 77 लाख रुपयांना चुना लागला. नाशिमधील एका व्यावसायिकासह तिघांची ऑनलाईन फसवणूक झाली.

Nashik News: शेअर मार्केटमध्ये पैसे डबल? नाशिकच्या तिघांसोबत भयंकर घडलं, 17700000 रुपयांना गंडा!
Nashik News: शेअर मार्केटमध्ये पैसे डबल? नाशिकच्या तिघांसोबत भयंकर घडलं, 17700000 रुपयांना गंडा!
नाशिक: शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर अवाढव्य नफ्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी शहरातील एका व्यावसायिकासाह दोन नोकरदारांना तब्बल १ कोटी ७७ लाख रुपयांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, तांत्रिक ज्ञान असलेल्या उच्चशिक्षितांनाच या सायबर गुन्हेगारांनी आपल्या जाळ्यात ओढल्याने खळबळ माजली आहे.
'व्हर्च्युअल नफ्या'चा असा आहे सापळा
सायबर गुन्हेगारांनी ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत या तिघांशी संपर्क साधला. त्यांना एका बनावट व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये सामील करण्यात आले. या ग्रुपमध्ये आधीच असलेले गुन्हेगारांचे साथीदार 'गुंतवणूक किती फायदेशीर आहे' यावर खोटी चर्चा करून विश्वास संपादन करत असत. गुंतवणूकदारांना फसवण्यासाठी एका बनावट ॲपवर त्यांच्या रकमेत मोठी वाढ झाल्याचे (Virtual Profit) दाखवले जायचे. हा नफा पाहून भुरळ पडलेल्या तिघांनीही वेळोवेळी मोठी रक्कम गुंतवली.
advertisement
पैसे काढताना फुटला घाम
जेव्हा या तिघांनी आपला नफा बँक खात्यात वळवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना तांत्रिक अडचणी सांगून आणखी पैशांची मागणी करण्यात आली. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली. तपासात अनया वर्मा, वंशिका गिल आणि नविशा सन्यम या नावांच्या बँक खात्यांवर ही रक्कम वर्ग झाल्याचे निष्पन्न झाले असून, पोलिसांनी या खातेधारकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
advertisement
"शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली ऑनलाइन दाखविल्या जाणाऱ्या कोणत्याही स्किमवर आंधळा विश्वास ठेवू नका. अनोळखी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधील सल्ल्यानुसार आर्थिक व्यवहार करणे धोक्याचे आहे. खात्री केल्याशिवाय कोणालाही पैसे पाठवू नका." असे आवाहन सायबर पोलिस निरीक्षक संजय पिसे यांनी नागरिकांना केले आहे.
सावध राहण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा:
  • सोशल मीडिया जाहिरातींपासून सावध रहा: फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर येणाऱ्या 'Stock Tips' च्या जाहिरातींना बळी पडू नका.
  • ॲपची पडताळणी करा: केवळ SEBI कडे नोंदणीकृत असलेल्या अधिकृत ब्रोकरेज ॲप्सचाच वापर करा.
  • अवाढव्य परतावा: कोणताही कायदेशीर व्यवसाय एका रात्रीत पैसे दुप्पट करून देत नाही.
  • ग्रुप मधील चॅटिंग: व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधील लोक गुंतवणुकीचे दावे करत असतील, तर ते गुन्हेगारांचे हस्तक असू शकतात.
advertisement
तुम्हीही अशा फसवणुकीचे बळी ठरला असाल, तर तातडीने १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा किंवा www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik News: शेअर मार्केटमध्ये पैसे डबल? नाशिकच्या तिघांसोबत भयंकर घडलं, 17700000 रुपयांना गंडा!
Next Article
advertisement
Uddhav Thackeray Raj Thackeray: दणक्यात युतीची घोषणा, पण जागा वाटपावर मौन, ठाकरेंच्या निर्णयामागचं 'राज'काय?
दणक्यात युतीची घोषणा, पण जागा वाटपावर मौन, ठाकरेंच्या निर्णयामागचं 'राज'काय?
  • दणक्यात युतीची घोषणा, पण जागा वाटपावर मौन, ठाकरेंच्या निर्णयामागचं 'राज'काय?

  • दणक्यात युतीची घोषणा, पण जागा वाटपावर मौन, ठाकरेंच्या निर्णयामागचं 'राज'काय?

  • दणक्यात युतीची घोषणा, पण जागा वाटपावर मौन, ठाकरेंच्या निर्णयामागचं 'राज'काय?

View All
advertisement