ख्रिसमसच्या दिवशी सोयाबीनच्या बाजारात तेजी! नवीन वर्षात दर कडाडणार? आजचे मार्केट काय?

Last Updated:

Soyabean Bajar Bhav : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरांमध्ये संमिश्र चित्र पाहायला मिळाले. काही प्रमुख बाजारांत दर समाधानकारक पातळीवर राहिले असले, तरी मोठ्या आवकेमुळे काही ठिकाणी दरांवर दबाव जाणवला.

soyabean market update
soyabean market update
मुंबई : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरांमध्ये संमिश्र चित्र पाहायला मिळाले. काही प्रमुख बाजारांत दर समाधानकारक पातळीवर राहिले असले, तरी मोठ्या आवकेमुळे काही ठिकाणी दरांवर दबाव जाणवला. एकूणच राज्यभरात सोयाबीनचे सरासरी दर 4,000 ते 4,800 रुपयांच्या दरम्यान स्थिरावलेले दिसून आले.
advertisement
ताजे बाजारभाव काय?
येवला बाजार समितीत 52 क्विंटल आवक नोंदवली गेली. येथे किमान दर 3,900 रुपये, तर कमाल 4,610 रुपये असून सरासरी दर 4,480 रुपये मिळाला. लासलगाव-विंचूर येथे 368 क्विंटल आवकेसह दर 3,000 ते 4,761 रुपयांपर्यंत गेले असून सरासरी दर 4,700 रुपये राहिला. जळगाव बाजार समितीत 492 क्विंटल आवक असून सर्वच व्यवहार 5,328 रुपयांवर झाले, ही बाब शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरली आहे.
advertisement
छत्रपती संभाजीनगरमध्ये मर्यादित 26 क्विंटल आवक झाली. येथे दर 4,000 ते 4,500 रुपयांच्या दरम्यान राहिले. माजलगाव बाजारात मोठी म्हणजेच 2,820 क्विंटल आवक झाली. मात्र तरीही दर स्थिर राहून किमान 3,500, कमाल 4,682 आणि सरासरी 4,400 रुपये मिळाले. चंद्रपूरमध्ये 55 क्विंटल आवकेसह सरासरी दर 4,280 रुपये राहिला.
advertisement
उत्तर महाराष्ट्रात काही बाजारांत चांगले दर मिळाल्याचे चित्र आहे. राहुरी-वांबोरी येथे केवळ 8 क्विंटल आवक असून 4,521 रुपये सरासरी दर मिळाला. पाचोरा बाजारात 170 क्विंटल आवक झाली असून सरासरी दर 4,000 रुपये राहिला. कोरेगाव आणि तुळजापूर या बाजारांत सोयाबीनला 5,328 व 4,600 रुपयांचे स्थिर दर मिळाले.
advertisement
मराठवाड्यात लातूर, जालना आणि बीड या प्रमुख बाजारांत मोठी आवक असूनही दर तुलनेने चांगले राहिले. लातूर बाजारात तब्बल 8,732 क्विंटल आवक झाली असून कमाल दर 4,900 व सरासरी दर 4,850 रुपये मिळाला. जालना येथे 5,490 क्विंटल आवकेसह दर 4,000 ते 5,200 रुपयांपर्यंत गेले. बीडमध्ये सरासरी दर 4,579 रुपये राहिला.
advertisement
विदर्भात अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशीम आणि हिंगोली या बाजारांत मोठ्या प्रमाणावर आवक नोंदवली गेली. अमरावतीत 5,358 क्विंटल आवक असून सरासरी दर 4,350 रुपये राहिला. अकोल्यात 3,881 क्विंटल आवकेसह सरासरी दर 4,500 रुपये मिळाला. वाशीम बाजारात मात्र दरांनी उच्चांक गाठला असून कमाल दर 5,900 आणि सरासरी 5,500 रुपये मिळाले, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/कृषी/
ख्रिसमसच्या दिवशी सोयाबीनच्या बाजारात तेजी! नवीन वर्षात दर कडाडणार? आजचे मार्केट काय?
Next Article
advertisement
Gold Price Prediction: सोनं-चांदी खरेदी करायचं की थांबायचं, नव्या वर्षात स्वस्त होणार की महाग? एक्सपर्टनं थेट सांगितलं...
सोनं-चांदी खरेदी करायचं की थांबायचं, नव्या वर्षात स्वस्त होणार की महाग? एक्सपर्ट
  • सोनं-चांदी खरेदी करायचं की थांबायचं, नव्या वर्षात स्वस्त होणार की महाग? एक्सपर्ट

  • सोनं-चांदी खरेदी करायचं की थांबायचं, नव्या वर्षात स्वस्त होणार की महाग? एक्सपर्ट

  • सोनं-चांदी खरेदी करायचं की थांबायचं, नव्या वर्षात स्वस्त होणार की महाग? एक्सपर्ट

View All
advertisement