'इक्कीस' हा चित्रपट अनेक अर्थांनी खास आहे. एक तर हा दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट आहे आणि दुसरीकडे यातून अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला रेखा यांनी आपल्या नेहमीच्या शाही अंदाजात हजेरी लावली.
अगस्त्य नंदाला दिला फ्लाइंग किस
रेड कार्पेटवर फोटोसाठी पोझ देत असताना रेखाची नजर चित्रपटाच्या पोस्टरवर पडली. तिथे धर्मेंद्र यांचा फोटो पाहून रेखा क्षणभर भावूक झाल्या. त्यांनी त्यांच्या प्रतिमेसमोर हात जोडून आदर व्यक्त केला. इथपर्यंत सगळं ठीक होतं, पण खरी चर्चा सुरू झाली ती पुढच्या क्षणापासून. रेखा यांनी जवळच असलेल्या अगस्त्य नंदाच्या पोस्टरकडे आपला मोर्चा वळवला. त्यांनी आधी अगस्त्यच्या फोटोवर मायेने हात फिरवला, त्याला जणू आशीर्वाद दिला आणि त्यानंतर चक्क पोस्टरवर फ्लाईंग किस केला.
advertisement
रेखा यांचा हा व्हिडिओ क्षणात वणव्यासारखा पसरला आणि कमेंट्सचा पाऊस पडू लागला. अनेक चाहत्यांना रेखाचा हा अंदाज आवडला असला, तरी काहींनी त्यांना चांगलंच ट्रोल केलं आहे.
सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला व्हिडीओ
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'रेडिट'वर या व्हिडिओवरून बराच कल्ला पाहायला मिळतोय. एका युजरने संताप व्यक्त करत लिहिलं, "एकेकाळी मला ही स्त्री खूप आवडायची, पण आता ती फक्त लक्ष वेधून घेण्यासाठी काहीही करते असं वाटतंय. हे सगळं खूप बनावट आणि ओढून ताणून केल्यासारखं दिसतं." तर दुसऱ्या एकाने म्हटलं, "इतकं विचित्र वागून तिला नक्की काय साध्य करायचं आहे? हे मुळीच कौतुकास्पद नाही, उलट थोडं विचित्र वाटतंय."
अमिताभ बच्चन यांच्याशी अगस्त्यचं नातं
अगस्त्य नंदा हा अमिताभ बच्चन यांचा नातू असल्यामुळे रेखा यांनी त्याच्यावर उधळलेल्या प्रेमाचा संबंध जुन्या कथित अपुऱ्या प्रेमकहाणीशी जोडला जात आहे. "अमिताभ यांच्या नातवाबद्दल इतकं उघडपणे प्रेम व्यक्त करून रेखा पुन्हा एकदा चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहे का?" असा सवाल नेटकरी विचारत आहेत.
