TRENDING:

Viral Song : "आप्पाचा विषय लय हार्ड आहे", कोण आहे व्हायरल गाण्याचा गायक?

Last Updated:

नेटकरी 'आप्पाचा विषय हार्ड आहे' वर रील्स करताना दिसत आहेत. हे आप्पा नेमके आहेत तरी कोण? आता आप्पा विषय हार्ड करणारा गायक कोण ? पाहूयात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल काही सांगता येतनाही. इन्स्टाग्रामवर दररोज ट्रेंड बदलत असतात. कधी गुबाली साडी तर कधी चिन टपाक डम डम ऐकून येतं. या सगळ्यांना मागे टाकत सध्या आप्पांनी विषय हार्ड केला आहे. आप्पाचा विषय लय हार्ड आहे हे गाणं सध्या इन्स्टाग्राम रील्सवर चांगलाच वाजतंय. नेटकरी 'आप्पाचा विषय हार्ड आहे' वर रील्स करताना दिसत आहेत. हे आप्पा नेमके आहेत तरी कोण? आता आप्पा विषय हार्ड करणारा गायक कोण ? पाहूयात.
आप्पाचा विषय लय हार्ड आहे
आप्पाचा विषय लय हार्ड आहे
advertisement

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात एक वृद्ध आजोबा वेगळ्याच स्वॅगमध्ये मोठ्या ऐटीत चालत चालत बाहेर येतात. त्यांच्या मागे एक आजी छत्री घेऊन उभ्या आहेत. एका बाजूला त्यांचा नातू आप्पाचा विषय हार्ड आहे असं म्हणतोय. "आप्पाचा विषय लय हार्ड आहे, आप्पाकडे क्रेडिटचं कार्ड आहे, आप्पाचं घरात नाय ध्यान पण आप्पाचे बाहेर लय लाड आहे", असे त्या गाण्याचे शब्द आहेत.

advertisement

( Aasa Kooda गाणं सोशल मीडयावर हिट, पण 'या' शब्दाचा अर्थ माहितीय का? )

आप्पाचा विषय लय हार्ड आहे हे एक रॅप साँग आहे. वरदान नावाच्या इन्स्टाग्राम आणि युट्यूब चॅनेलवर हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. ऋषी भोसले नावाच्या एका कलाकारानं हे रॅप साँग तयार केलं आहे. आप्पाचा विषय लय हार्ड आहे हे गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहेत. ऋषी भोसले यांनं याआधी देखील अनेक रॅप साँग बनवले. पण आप्पाचा विषय लय हार्ड आहे हे त्याचं रॅप चांगलंच हिट झालं आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: कृषी मार्केटमध्ये उलटफेर, कांदा, केळीनं वाढवलं टेन्शन, लिंबू अन् द्राक्षांना किती मिळाला भाव?
सर्व पहा

आप्पाचा विषय लय हार्ड आहे या गाण्यावर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी रील तयार केले आहेत. एका मुलीनं नाकात नथ घालून या गाण्यावर लिप्सिंग केलं आहे. तिचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. वृद्ध आजोबांच्या व्हिडीओला तर तुफान हिट्स मिळाल्या आहेत.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Viral Song : "आप्पाचा विषय लय हार्ड आहे", कोण आहे व्हायरल गाण्याचा गायक?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल