Aasa Kooda गाणं सोशल मीडयावर हिट, पण 'या' शब्दाचा अर्थ माहितीय का?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
पण हे गाणे कोणी गायले आहे आणि हिंदीत 'आसा कूडा' चा अर्थ काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? चला समजून घेऊया.
मुंबई : सोशल मीडियावर कधीकधी काही व्हिडीओ रातोरात व्हायरल होतात आणि एखादी व्यक्ती झटक्यात प्रसिद्ध होते. तर काही सिनेमांची गाणी ही सोशल मीडियावर ट्रेंडवर येतात, ज्यावर अनेक लोक व्हिडीओ बनवतात. असंच एक गाणं किंवा म्यूजिक व्हिडीओ सोशल मीडियावर सगळ्यात जास्त ट्रेंड होतं ते "Aasa Kooda" गाणं.
इंस्टाग्रामच नाही तर युट्यूबवर देखील हे गाणं हिट ठरलं आहे. तसे पाहाता हे गाणं तामिळ भाषेतील आहे, ज्यामुळे अनेकांना त्याचे बोल किंवा अर्थ माहित नाही. पण त्याचं म्युजिक मात्र डोक्यात चांगलंच फिट आहे. शिवाय या गाण्यावर डान्स केलेल्या तरुणीचे देखील लोक फॅन झाले आहे.
पण हे गाणे कोणी गायले आहे आणि हिंदीत 'आसा कूडा' चा अर्थ काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? चला समजून घेऊया.
advertisement
आसा कूडा हे गाणं साई स्मृती आणि साई अभ्यंकर यांनी गायलेले एकभाषी तमिळ गाणं आहे. हे रोमँटिक गाणं 'थिंक इंडी' या अल्बमचा भाग आहे. ज्यामध्ये एक मुलगा आणि मुलगी योगायोगाने भेटतात आणि नंतर दोघेही पहिल्याच नजरेत प्रेमात पडतात.
म्युझिक व्हिडिओमध्ये असे दाखवण्यात आले आहे की दोघेही एकमेकांसोबत डान्स करतात आणि या रोमँटिक सीक्वेन्स दरम्यान मुलगा आणि मुलगी त्यांच्या भावना व्यक्त करतात. हे गाणे जितके सुंदर आहे, तितकेच त्याचा व्हिडीओही छान चित्रीत केला आहे, ज्यांमुळे तो हिट ठरला.
advertisement
लोक YouTube वर याची हिंदी आवृत्ती शोधत आहेत, तसेच याचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
या गाण्याचे हिंदी व्हर्जन अद्याप अधिकृतपणे रिलीज झाले नसले तरी अनेकांनी स्वत:हून या गाण्याचे हिंदी व्हर्जन तयार केले असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
हिंदीमध्ये 'आसा कुडा' म्हणजे काय?
आता प्रश्न असा आहे की “आसा कुडा” म्हणजे काय? वास्तविक तमिळमध्ये आसा म्हणजे इच्छा आणि कुडा म्हणजे वाढणे म्हणजेच वेगाने वाढणारी इच्छा असा होतो. या गाण्यात मुलगा आणि मुलगी यांच्या मनात एकमेकांना शोधण्याची जी उमेद वाढत चालली आहे ते गाण्याचे शीर्षक करण्यात आले आहे.
advertisement
आता तरी तुम्हाला या शब्दाचा अर्थ आणि गाण्याबद्दल कळलं असेल, मग आता पूर्ण फिलमध्ये हे गाणं ऐका आणि एन्जॉय.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 19, 2024 7:51 PM IST









