अवधुत गुप्तेची पोस्ट काय? (Avadhoot Gupte Post)
अवधुतने लिहिलं आहे,"मुंबईतल्या घरांमध्ये भिंतीवर ‘पाल‘ दिसली तरी शेजार पाजाऱ्यांना बोलवून “ऐऽऽ!! ऊऽऽ!!” चा दंगा करणाऱ्यांनी आमच्या बोरिवलीच्या श्रीकृष्ण नगर परिसरामध्ये गेल्या दोन दिवसात मिळालेले हे दोन अजगर नक्की पहावेत! माकडांबरोबर तर आमचे सहजीवनच. परंतु, कधी बिबट्या तर कधी अजगरासारखा पाहुणा आमच्या कॉलनीमध्ये आला, की कृष्णनगर वासियांचा उत्साह हा अक्षरशः सण-सोहळ्यासारखा असतो! अर्थात आमच्यावर संस्कारच निसर्ग प्रेमाचे. ते आमच्या घरात येत नसून, आम्हीच त्यांच्या घरात घर बांधले आहे याची जाणीव प्रत्येक नगरवासीयाला कायम असते".
advertisement
अवधुतने पुढे लिहिलं आहे,"त्यामुळे या दोन अजगरांनादेखील सर्पप्रेमींच्या मजतीने त्यांच्या इष्ट स्थळी पुनश्च पोहोचवण्यात आले. ही पोस्ट कुठल्याही वन अधिकाऱ्याने किंवा वनविभागाने कुठलीही कारवाई करावी यासाठी नसून, आमच्या कृष्णनगराचे कौतुक करण्यासाठी आहे. त्याचप्रमाणे कृष्ण नगर आणि आजूबाजूच्या परिसरात नव्याने विस्थापित होणाऱ्या नव्या शेजाऱ्यांचे स्वागत करत असतानाच त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करुन देण्यासाठी आहे. जय श्री कृष्ण नगर! जय बोरिवली पूर्व!". अवधुतच्या पोस्टवर काळजी घ्या, बाप रे, अशा पद्धतीच्या कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
Horror Movies : 2025 मध्ये हॉररचा थरार! 'हे' सिनेमे पाहून तुमची झोप उडणार, पाचवा तर खूपच भयानक
हृता दुर्गुळे आणि ललित प्रभाकर यांच्या 'आरपार' या चित्रपटाचं सध्या कौतुक होत आहे. या चित्रपटातील '36 गुण' हे गाणं अवधुत गुप्तेने गायलं आहे. हे गाणं सिनेप्रेमींच्या विशेष पसंतीस उतरत आहे. तर दुसरीकडे हार्दिक जोशीच्या आगामी 'अरण्य' चित्रपटातील 'रेला' गीतदेखील अवधुतने गायलं आहे. गायकाच्या आगामी गाण्यांची प्रेक्षकांना आता उत्सुकता आहे.