Navratri Shopping: नवरात्रासाठी करा स्वस्तात मस्त खरेदी, फक्त 150 रुपयांत चनिया चोळी, मुंबईतील प्रसिद्ध मार्केटला द्या भेट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
नवरात्र सुरू व्हायला आता अवघा आठवडा बाकी आहे. या ठिकाणी तुम्ही स्वस्तात चनिया चोळी खरेदी करू शकता.
मुंबई: नवरात्र सुरू व्हायला आता अवघा आठवडा बाकी आहे आणि शहरात खरेदीला सुरुवात झाली आहे. या निमित्तानेच मुंबईतील मालाड मार्केट हे नवरात्रात गरबा–दांडियासाठी लागणारे कपडे घेण्यासाठी सर्वात गजबजलेले ठिकाण ठरत आहे. या ठिकाणी तुम्ही स्वस्तात चनिया चोळी खरेदी करू शकता.
लहान मुलांसाठी स्वस्त ड्रेस
येथे लहान मुलांसाठी चनिया चोळी आणि घागरा चोळीची किंमत अगदी 150, 180 आणि 210 रुपयांपासून सुरू होते. कच्ची वर्क, कॉटन वर्क, तसेच रंगीत भरतकामाचे विविध डिझाईन्स उपलब्ध आहेत. हलक्या वजनाचे असल्याने मुले सहज घालू शकतात आणि गरब्यात आनंदाने सहभागी होऊ शकतात.
advertisement
मोठ्या मुलींसाठी खास कलेक्शन
फक्त लहान मुलांसाठीच नव्हे, तर मोठ्या मुलींसाठी आणि तरुणींनाही इथे परवडणाऱ्या दरात उत्तम पर्याय मिळतात.
350 रुपयांपासून दुपट्टा सेट
550 रुपयांपासून डिझायनर चनिया चोळी
750 रुपयांपासून खास घागरा–चनिया चोळी
हेच ड्रेस बाहेरच्या बाजारात 1000 ते 1200 रुपयांपासून मिळतात, मात्र मालाड मार्केटमध्ये जवळजवळ अर्ध्या दरात खरेदी करता येतात.
advertisement
स्टाईल्स आणि डिझाईन्स, कच्ची वर्क चनिया चोळी, कॉटन वर्क घागरा चोळी, जॅकेट–दुपट्टा सेट, हलक्या वजनाचे मुलांसाठी खास घागरे मिळतात.
नवरात्रातील नऊ दिवस नऊ रंग या परंपरेनुसार अनेक महिला रोज वेगळा ड्रेस घालतात. अशा वेळी होलसेल दरात नऊ ड्रेस खरेदी करण्यासाठी मालाड मार्केट उत्तम ठरते. स्वस्त दरात रंगीबेरंगी कपडे मिळाल्यामुळे नऊ दिवसांचा पूर्ण कलेक्शन एकाच वेळी घेणे सोपे होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 17, 2025 5:00 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Navratri Shopping: नवरात्रासाठी करा स्वस्तात मस्त खरेदी, फक्त 150 रुपयांत चनिया चोळी, मुंबईतील प्रसिद्ध मार्केटला द्या भेट