...तर मुंबईचा महापौर 'खान' होईल, अमित साटम यांचं वादग्रस्त वक्तव्य, रईस शेख यांचं रोखठोक प्रत्युत्तर

Last Updated:

BJP Amit Satam: वरळी येथे मंगळवारी भाजपच्या विजयी संकल्प मेळाव्यात आमदार साटम यांनी ‘उद्धव ठाकरे यांची शिवसेना मुंबई महापालिकेत सत्तेत आली तर 'खान' मुंबईचा महापौर होईल, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.

अमित साटम आणि रईस शेख
अमित साटम आणि रईस शेख
मुंबई : मुंबईकर नागरीक असले आणि मुंबईकरांचे प्रेम असेल तर मुंबापुरीचा महापौर डिसोजा, खान, खानोलकर असा कोणीही होऊ शकतो, अशा शब्दात समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमीत साटम यांना प्रत्युत्तर दिले.
वरळी येथे मंगळवारी भाजपच्या विजयी संकल्प मेळाव्यात आमदार साटम यांनी ‘उद्धव ठाकरे यांची शिवसेना मुंबई महापालिकेत सत्तेत आली तर 'खान' मुंबईचा महापौर होईल, असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. ठाकरेंची शिवसेना खान महापौर करेल पण भाजप ते होऊ देणार नाही. मुंबईवर हिरवे संकट आले आहे. मुंबईचा रंग बदलण्याचा कोणताही प्रयत्न हाणून पाडला जाईल, असे अमित साटम म्हणाले होते.
advertisement

खान, डिसोझा, खानोलकर कुणीही मुंबईचा महापौर होऊ शकतं

अमित साटम यांचा समाचार घेताना आमदार रईस शेख म्हणाले, बोहरी, पारशी, ख्रिश्चन, मराठी, मुस्लिम कोणीही मुंबईचा महापौर होऊ शकतो. मुंबापुरी शहर काही भाजपची खाजगी जहागीर आहे काय? मुंबईकरांनी विश्वास व्यक्त केल्यास कोणत्याही जातीचा, धर्माचा मुंबईकर नागरिक या शहराचा महापौर होईल. मग, तो खान, डिसोझा नाही तर खानोलकर असू द्या... असे म्हणत रईस शेख यांनी अमित साटम यांना सणसणीत उत्तर दिले.
advertisement

भाजपकडे मुंबईच्या विकासाचे मुद्दे नाहीत म्हणून धार्मिक तेढ वाढवतायेत

‘राज्यातील डबल इंजिन सरकार बंद पडले आहे. भाजपकडे मुंबईच्या विकासाचे काहीच मुद्दे राहिलेले नाहीत. त्यामुळे भाजप नेत्यांना निवडणूक काळात धार्मिक तेढ वाढविणाऱ्या मुद्द्यांना हात घालावा लागतो. भाजपला मुंबईचा विकास महत्वाचा वाटत नाही. त्यामुळे हे शहर असुरक्षितेतचा बागुलबुवा केला जातो आहे, असे आमदार रईस शेख म्हणाले.
advertisement

या देशाच्या मातीत आमच्याही पूर्वजांचे रक्त

या देशातील मातीमध्ये आमच्याही पूर्वजांचे रक्त मिसळलेले आहे. राजकीय नेत्यांचा धर्म काय पाहता? विकासात नेत्याने दिलेले योगदान व काम पाहा’, असा टोलाही आमदार रईस शेख यांनी भाजपाचे मुंबई अध्यक्ष व आमदार अमीत साटम यांना लगावला आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
...तर मुंबईचा महापौर 'खान' होईल, अमित साटम यांचं वादग्रस्त वक्तव्य, रईस शेख यांचं रोखठोक प्रत्युत्तर
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement