Railway Block : मुंबईकरांनो लक्ष द्या! पश्चिम रेल्वेवर आजपासून 30 दिवसांचा जम्बो ब्लॉक,वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा
Last Updated:
Western Railway Mega Block : कांदिवली ते बोरिवली दरम्यान सहाव्या मार्गाच्या कामासाठी पश्चिम रेल्वेने 30 दिवसांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. या काळात लोकल, मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम होणार आहे.
मुंबई : मुंबईसह उपनगरातील दररोज लाखो लोकांच्या प्रवासाचे मुख्य साधनही ही लोकल ट्रेन आहे. याच प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर येत आहे जी म्हणजे पश्चिम रेल्वेच्या कांदिवली–बोरिवली विभागात सहाव्या मार्गाच्या कामासाठी मोठा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.चला तर जाणून घेऊयात या ब्लॉक दरम्यान गाड्यांचे वेळापत्रक कसे असेल शिवाय किती दिवसांचा हा ब्लॉक असणार आहे.
लोकलने प्रवास करणाऱ्यांनी लक्ष द्या
शनिवारी रात्रीपासून सुरू होणारा हा ब्लॉक सलग 30 दिवसांचा असणार असून या दिवसात रेल्वे पायाभूत सुविधांचे महत्त्वाचे काम केले जाणार आहे. कांदिवली ते बोरिवली दरम्यान रूळ बदलणे, विविध ठिकाणी क्रॉसओव्हर बसवणे आणि काढणे तसेच सिग्नलिंग, अभियांत्रिकी आणि ओव्हरहेड उपकरणांशी संबंधित कामे हाती घेण्यात येणार आहेत.
कसे असे वेळापत्रक?
या ब्लॉक कालावधीत पश्चिम रेल्वेवरील पाचवा मार्ग पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे उर्वरित मार्गांवर गाड्यांचा वेग मर्यादित ठेवण्यात येणार असून याचा थेट परिणाम लोकल, प्रवासी तसेच मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार आहे.
advertisement
पाचव्या मार्गावरून धावणाऱ्या सर्व मेल,एक्स्प्रेस आणि लोकल गाड्या अंधेरी किंवा गोरेगाव ते बोरिवलीदरम्यान जलद मार्गावरून वळवण्यात येणार आहेत. परिणामी काही लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द तर काही गाड्यांच्या वेळांमध्ये बदल करण्यात येणार आहेत. प्रवाशांनी प्रवासापूर्वी सुधारित वेळापत्रक तपासावे असे आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाने केले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 20, 2025 7:18 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Railway Block : मुंबईकरांनो लक्ष द्या! पश्चिम रेल्वेवर आजपासून 30 दिवसांचा जम्बो ब्लॉक,वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा







