पुण्यात चाललंय काय! रिक्षाचं बुकिंग रद्द केल्याचा राग; चालकाकडून तरुणाचं अपहरण, मग धक्कादायक कृत्य

Last Updated:

सुमीत रतन पटाईत (वय २१, रा. आंबी) याने १४ डिसेंबर रोजी रात्री ९ च्या सुमारास एका ऑनलाइन ॲपद्वारे रिक्षा बुक केली होती. मात्र, काही कारणास्तव त्याने हे बुकिंग रद्द केले

चालकाकडून तरुणाचं अपहरण
चालकाकडून तरुणाचं अपहरण
पिंपरी-चिंचवड: ऑनलाइन टॅक्सी किंवा रिक्षा बुकिंग रद्द केल्यावर अनेकदा दंड आकारला जातो. पण आंबी परिसरात या कारणावरून एका तरुणाला चक्क अपहरणाला आणि मारहाणीला सामोरे जावे लागल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. रिक्षा का रद्द केली? या रागातून तीन तरुणांनी एका २१ वर्षीय विद्यार्थ्याला जबरदस्तीने रिक्षात बसवून त्याचे अपहरण केले. इतकेच नाही, तर त्याच्याकडे खंडणीची मागणी केली.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सुमीत रतन पटाईत (वय २१, रा. आंबी) याने १४ डिसेंबर रोजी रात्री ९ च्या सुमारास एका ऑनलाइन ॲपद्वारे रिक्षा बुक केली होती. मात्र, काही कारणास्तव त्याने हे बुकिंग रद्द केले. याच गोष्टीचा राग मनात धरून रिक्षाचालक मिथुन शेळके आणि त्याचे दोन साथीदार साहिल वारिंगे आणि पवन पुयाद यांनी सुमीतला डी. वाय. पाटील कॉलेजजवळ गाठले.
advertisement
मारहाण आणि खंडणीची मागणी: आरोपींनी सुमीतला जबरदस्तीने स्कूटी आणि रिक्षात बसवून निर्जन स्थळी नेले. तिथे त्याला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली आणि अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थांबता, 'बुकिंग रद्द केल्यामुळे आमचे नुकसान झाले आहे' असे म्हणत आरोपींनी सुमीतला सोडण्यासाठी तीन हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली. या प्रकारामुळे सुमीत प्रचंड घाबरला होता.
advertisement
या घटनेनंतर सुमीतने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी मिथुन शेळके, साहिल वारिंगे आणि पवन पुयाद या तिघांविरुद्ध अपहरण, मारहाण आणि खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात चाललंय काय! रिक्षाचं बुकिंग रद्द केल्याचा राग; चालकाकडून तरुणाचं अपहरण, मग धक्कादायक कृत्य
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement