Do You Know : जगातील सर्वात मोठा जमीनदार कोण? ज्यांकडे आहे जगातील 16% जमिनीची मालकी
- Published by:Devika Shinde
Last Updated:
जगात काही कुटुंबं अशी आहेत ज्यांच्याकडे शेकडो नाही तर अब्जावधी एकरांमध्ये जमीन आहे. आता तुम्हाला आश्चर्य नक्कीच वाटलं असेल आणि हे कसं शक्य आहे आणि ती घराणं कोणतं असा देखील प्रश्न पडला असेल
जमीन ही माणसासाठी सर्वात मौल्यवान संपत्ती मानली जाते. घर, शेतजमीन किंवा प्रॉपर्टी ही प्रत्येकाची गरज असते. लग्न करताना देखील कुटुंबीय या सगळ्या गोष्टी पाहूनच लग्न करतात. जेवढी जास्त मालमत्ता किंवा जमीन तेवढी ती व्यक्ती श्रीमंत असा समज देखील अनेकांच्या मनात आहे. पण जगात काही कुटुंबं अशी आहेत ज्यांच्याकडे शेकडो नाही तर अब्जावधी एकरांमध्ये जमीन आहे. आता तुम्हाला आश्चर्य नक्कीच वाटलं असेल आणि हे कसं शक्य आहे आणि ती घराणं कोणतं असा देखील प्रश्न पडला असेल
advertisement
advertisement
advertisement
advertisement
महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा राजा चार्ल्स तृतीय गादीवर आला आणि या संपत्तीवर त्याचा हक्क मिळाला. अंदाजानुसार त्यांच्याकडे तब्बल 6.6 अब्ज एकर जमीन आहे, ज्यात ब्रिटन, आयर्लंड, स्कॉटलंड, वेल्स, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि राष्ट्रकुल देशांमधील भूभाग समाविष्ट आहे. हे प्रमाण जगाच्या एकूण जमिनीच्या 16.6 टक्के आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
दुसऱ्या क्रमांकावर सौदी शाही कुटुंब
ब्रिटिश शाही कुटुंबानंतर दुसऱ्या क्रमांकावर सौदी अरेबियाचं शाही कुटुंब आहे. माजी राजा अब्दुल्ला यांच्या मालकीत जवळपास 8,30,000 चौरस मैल जमीन होती. त्यासोबतच तेलाच्या प्रचंड संपत्तीमुळे हे कुटुंब जगातील सर्वात श्रीमंत आणि प्रभावशाली घराण्यांपैकी एक मानलं जातं.
थोडक्यात, जमीन आणि प्रॉपर्टीच्या दृष्टीने पाहिलं तर ब्रिटिश शाही कुटुंब आजही जगातील सर्वात मोठा जमीनदार मानलं जातं.