Beed Railway: बीडकरांची स्वप्नपूर्ती! अहिल्यानगर-बीड रेल्वे सुरू; थांबे, वेळापत्रक आणि तिकीट दर

Last Updated:
Beed Railway: बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित अहिल्यानगर ते बीड रेल्वे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनापासून धावण्यास सुरुवात झाली. 17 सप्टेंबर 2025 रोजी तब्बल 40 वर्षांपासून बीडकरांनी पाहिलेलं स्वप्न साकार झालं आहे. त्यामुळे आता बीडकरांना बीड ते अहिल्यानगर प्रवास करता येणार आहे.
1/7
गेल्या 40 वर्षांपासून बीडकरांनी पाहिलेलं स्वप्न अखेर सत्यात उतरलं आहे. त्यामुळे अहिल्यानगर ते बीड प्रवास आता रेल्वेतून करता येणार आहे. या रेल्वेसाठी महापारेषणकडून वीज घेतली जाणार आहे. त्यासाठी 232 केव्हीए क्षमतेच्या दोन उपकेंद्रांची उभारणी केली जात आहे. याचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत रेल्वे डिझेलवकरच धावेल. त्यामुळे वेग काहीसा कमी राहणार असून विद्युतीकरण पूर्ण झाल्यानंतर प्रवास सुसाट होईल.

advertisement
2/7
अहिल्यानगर-बीड रेल्वे अहिल्यानगरहून सकाळी 6.55 वाजता सुटेल आणि दुपारी 12.30 वाजता बीडला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही रेल्वे बीडहून दुपारी 1 वाजता सुटेल आणि सायंकाळी साडेसहा वाजता अहिल्यानगर येथे पोहोचेल. आठवड्यात सहा दिवस ही गाडी धावणार असून रविवारी विश्रांती असणार आहे.

3/7
अहिल्यानगर परळी रेल्वे प्रकल्पांतर्गत ही डेमू रेल्वे सुरू होत आहे. या रेल्वेला अहिल्यानगर ते बीडदरम्यान 16 स्थानके अणार आहेत. अहिल्यानगरहून सुटल्यानंतर नारायणडोह, लोणी, सोलापूरवाडी, धानोरा, कडा, आष्टी, अमळनेर (भांड्याचे), रायमोह, एगनवाडी, जाटनांदूर, राजुरी येथे थांबे घेत बीडला पोहोचेल.

4/7
नव्या रेल्वेमुळे अहिल्यानगर ते बीड प्रवास अगदी स्वस्तात होणार आहे. अवघ्या 45 रुपयांत हा प्रवास होणार असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. परंतु, रेल्वेस्थानक शहरापासून दूर आहे. त्यामुळे तिथंपर्यंत रिक्षाने जाण्यासाठी याहून अधिक पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे.

5/7
अहिल्यानगर – बीड – परळी असा एकूण 261 किलोमीटरचा मार्ग आहे. त्यावरील 166 किलोमीटरचा अहिल्यानगर ते बीड हा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. तर बीड ते परळी या टप्प्यातील काही कामे अद्याप अपूर्ण आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात गाडी बीड ते अहिल्यानगर अशीच धावणार आहे. परळीकरांना आणखी काही काळ वाटच पाहावी लागेल.

6/7
अहिल्यानगर – बीड रेल्वे प्रकल्पाची मागणी 40 वर्षांपासून होत आहे. या लोहमार्गाला तांत्रिक मान्यता 1995 मध्येच मिळाली होती. तेव्हा प्रकल्पाचा खर्च 355 कोटी रुपये होता. हा प्रकल्प विविध कारणांनी लांबत गेला. आता या प्रकल्पाचा खर्च 4800 कोटी रुपयांवर गेला आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकार निम्मा आणि केंद्र सरकार निम्मा खर्च करत आहे. राज्य सरकारने 2241 कोटी रुपयांचा निधी आतापर्यंत दिला आहे.

7/7
दरम्यान, केंद्र आणि राज्य यांनी निम्मा-निम्मा खर्च घालून बीड रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी घेतला होता. त्या काळात केंद्र आणि राज्याच्या सहयोगातून होणारा हा पहिलाच प्रकल्प ठरला. दिवंगत गोपिनाथ मुंडे यांच्यासह अनेक नेत्यांनी नेत्यांनी या मार्गावरून रेल्वे धावावी यासाठी प्रयत्न केले.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement