भयंकर अपघात, तोंडावर 62 टाके; थोडक्यात वाचली होती क्रांती रेडकर, केदार शिंदेंनी सांगितला अंगावर काटे आणणारा प्रसंग
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Jatra Movie : केदार शिंदे यांनी असा एक किस्सा सांगितला, जो ऐकून प्रत्येकालाच धक्का बसला. केदार यांनी क्रांती रेडकरबद्दल एक धक्कादायक खुलासा केला.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
ते म्हणाले, "चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना एके दिवशी मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे त्यांनी त्या दिवशी शूटिंग थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी शूटिंग रद्द झाल्यामुळे काहीजणांनी पाचगणीला जाण्याचा प्लान केला आणि एक गाडी त्या दिशेने निघाली. त्या गाडीमध्ये क्रांती रेडकरही होती. केदार यांना याबद्दल माहिती मिळताच, त्यांनी क्रांतीला परत बोलावण्यासाठी निरोप पाठवला. त्यानुसार एक गाडी क्रांतीला परत आणण्यासाठी निघाली."
advertisement
केदार यांनी पुढे सांगितलं, "पाचगणीच्या अर्ध्या वाटेत असताना क्रांती निरोप पाठवलेल्या गाडीत बसून परत मागे फिरली आणि पहिली गाडी पुढे निघाली. मात्र, घाटात असतानाच पाचगणीला जाणाऱ्या गाडीचा भयानक अपघात झाला आणि गाडीतील प्रत्येक व्यक्ती गंभीररित्या जखमी झाला. क्रांती रेडकरच्या जागी बसलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर ६२ टाके घालण्यात आले होते."
advertisement
केदार शिंदे यांनी सांगितलं की त्या व्यक्तीच्या जागी जर क्रांती असती तर पहिल्याच चित्रपटानंतर तिचं करिअर संपलं असतं. क्रांतीही म्हणाली, "जर माझ्या चेहऱ्यावर ६२ टाके घालण्यात आले असते, तर माझा पहिलाच चित्रपट माझा शेवटचा चित्रपट ठरला असता. पण माझ्या जागेवर असलेला व्यक्ती जेव्हा शुद्धीवर आला, तेव्हा तो माझ्या तब्येतीची विचारणा करत होता. त्याच्या चेहऱ्यावर आजही ते व्रण आहेत."