Blockbuster सिनेमा, ज्याची कथा घेऊन डायरेक्टर 7 वर्ष फिरत होता, रिलीजनंतर उडवली खळबळ
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Blockbuster Movie: बॉलिवूडमध्ये असे अनेक सुपरहिट, ब्लॉकबस्टर सिनेमे आहेत ज्याची कथा ऐकून कोणीच यासाठी होकार देत नव्हतं.
मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक सुपरहिट, ब्लॉकबस्टर सिनेमे आहेत ज्याची कथा ऐकून कोणीच यासाठी होकार देत नव्हतं. मात्र अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर जेव्हा ते प्रदर्शित झाले तेव्हा ते बॉक्स ऑफिसवर खूप चालले आणि रेकॉर्ड मोडले. अशाच एका सिनेमाविषयी जाणून घेऊया जो ब्लॉकबस्टर ठरला मात्र या सिनेमाची स्क्रिप्ट घेऊन दिग्दर्शक 7 वर्षे भटकत राहिला.
या सिनेमाचा किस्सा नुकताच अनुराग कश्यप यांनी सांगितला. अनुराग कश्यप हे नेहमी त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. सध्या ते त्यांच्या बहुप्रतिक्षित ‘निशांची’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. यावेळी त्यांनी एका ब्लॉकबस्टर सिनेमाची बॅकस्टोरी सांगितली.
अनुराग कश्यप यांनी नुकतंच दिग्दर्शक मोहित सुरीचे कौतुक करताना बॉलिवूड निर्मात्यांवर थेट टीका केली. मोहित सुरीचा ‘सैयारा’ हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटातून अनन्या पांडेचा चुलत भाऊ अहान पांडेने पदार्पण केले. प्रेक्षकांनी चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद दिला. मात्र, हा यशस्वी प्रवास इतकासा सोपा नव्हता.
advertisement
खरं तर, ‘सैयारा’साठी मोहित सुरीला तब्बल सात वर्षे संघर्ष करावा लागला. ‘आशिकी 2’ आणि ‘एक व्हिलन’ सारखे हिट चित्रपट देऊनही, त्याच्या काही चित्रपटांचे बॉक्स ऑफिसवर अपयश आले. यामुळे निर्मात्यांचा त्याच्यावरील विश्वास उडाला आणि कोणीही ‘सैयारा’ला दाद देत नव्हते. पटकथा हातात असूनही, मोहित वर्षानुवर्षे निर्मात्यांच्या दारात फिरत राहिला. अनेकदा नकार मिळाले.
advertisement
शेवटी, मोहितने हार मानली नाही. त्याने नवीन कलाकारांसोबत आणि आपल्या खास शैलीत हा चित्रपट तयार करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या जिद्दीमुळे अखेर ‘सैयारा’ मोठ्या पडद्यावर आला आणि प्रचंड यशस्वी ठरला. अनुराग कश्यप यावर म्हणाले, “मोहित सुरीने सात वर्षे हा प्रवास केला, अनेक नकार सहन केले, तरीही तो डगमगला नाही. त्याने आपली कथा जपून ठेवली आणि ती आपल्या मनाप्रमाणेच बनवली. असे दिग्दर्शक फार कमी आहेत जे स्वतःच्या कथांशी इतके प्रामाणिक राहतात.”
advertisement
त्याचबरोबर, अनुराग कश्यप यांनी बॉलिवूडमधील निर्मात्यांवरही नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, “आज बॉलिवूडमध्ये खूप नवीन कल्पना आहेत. लेखक आणि दिग्दर्शकांकडे उत्तम कथा आहेत. पण खरी अडचण म्हणजे निर्माते. बहुतेक निर्माते जोखीम घेऊ इच्छित नाहीत. त्यांना सुरक्षित खेळायचं असतं. ते नेहमी हमखास हिट शोधतात. त्यामुळे नवीन आणि वेगळं काही सिनेमात दिसणं अवघड होतं.”
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 17, 2025 3:31 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Blockbuster सिनेमा, ज्याची कथा घेऊन डायरेक्टर 7 वर्ष फिरत होता, रिलीजनंतर उडवली खळबळ