Beed News : 'पेरलं कुणी, मशागत कुणी केली, बजरंग बाप्पा कापणीला आले', पंकजा मुंडेंचा टोला

Last Updated:

Beed Railway News : बीडकरांची अनेक वर्षांची प्रतिक्षा आज संपली. बीड-अहिल्यानगर रेल्वेचा आज शुभारंभ झाला. मात्र, आजच्या या उद्घाटन कार्यक्रमात श्रेयवादावरून राजकारण रंगल्याचे दिसून आले.

पेरलं कुणी, मशागत कुणी केली, बजरंग बाप्पा कापणीला आले, पंकजा मुंडेंचा टोला
पेरलं कुणी, मशागत कुणी केली, बजरंग बाप्पा कापणीला आले, पंकजा मुंडेंचा टोला
बीड: बीडकरांची अनेक वर्षांची प्रतिक्षा आज संपली. बीड-अहिल्यानगर रेल्वेचा आज शुभारंभ झाला. मात्र, आजच्या या उद्घाटन कार्यक्रमात श्रेयवादावरून राजकारण रंगल्याचे दिसून आले. बीड-नगर रेल्वे लोकार्पण सोहळ्यात कार्यकर्त्यांकडून उत्साही घोषणाबाजी, बॅनर झळकल्याने श्रेय कोणाचं असं दिसून आले. याच वेळी राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी पेरलं कुणी, मशागत कुणी केली, बजरंग बाप्पा कापणीला आले असे म्हणत जोरदार फटकेबाजी केली.
बीडकरांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. आजच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी शरद पवार गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्येही जोरदार बॅनर झळकले. दबंग खासदार म्हणून बजरंग बाप्पा यांचे बॅनर त्यांच्या समर्थकांनी झळकले. तर, गोपीनाथ मुंडे यांचेही बॅनर, फोटो मोठ्या प्रमाणावर दिसून आले.

अन् कापणीला बाप्पा आले...

आपल्या भाषणात पंकजा मुंडे यांनी म्हटले की, आज बीडच्या रेल्वे सेवेचा शुभारंभ होतोय, या प्रसंगीच्या भावना शब्दांच्या पलीकडील आहेत. अनेक दशक ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो, तो क्षण आला असल्याचे त्यांनी म्हटले. पंकजा यांनी दबंग खासदार असे म्हणत प्रीतम मुंडे यांचा उल्लेख केला. त्यांनी म्हटले की, अखेरच्या श्वासा पर्यंत जिल्ह्याची पालक म्हणून राहणार. आमच्या प्रीतमताईचे नाव घ्यायला हवे. त्या 10 वर्ष खासदार होत्या. नांगरले कोणी, पेरले कोणी पण कापणीला बजरंग बाप्पा तुम्ही आले, असे म्हणत पंकजा यांनी टोला लगावला.
advertisement
पंकजा मुंडे यांनी पुढे म्हटले की, गोपीनाथ मुंडे पहिल्यांदा खासदार झाले तेव्हा पहिल्यांदा मोठा निधी आणला. विरोधी बाकांवर असूनही त्यांनी 5 वर्षात 450 कोटींचा निधी आणला. मराठवाड्याच्या विकासासाठी गोपीनाथ मुंडे यांनी विलासराव देशमुख यांना आग्रह करून राज्य सरकारला या प्रकल्पात अर्धा वाटा द्यायचे कबूल केले. 2014 मध्ये मुंडे केंद्रीय मंत्री झाले पण त्यांचं स्वप्न अपूर्ण राहिले. मुंडे यांच्या पश्चात पंतप्रधान मोदी यांनी या प्रकल्पाला बळ दिले आणि 2600 कोटी रुपये विशेष प्रकल्प म्हणून बीड रेल्वेला दिले असल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वेची ट्रायल रन झाले तेव्हा प्रीतम मुंडे खासदार होत्या. सुरेश प्रभूंचा बीडमध्ये सत्कार आम्ही केला. बीडमध्ये रेल्वे आली. आता ही श्रेयवादाची ही वेळ नाही. अनेकांनी ही रेल्वे आणण्यासाठी प्रयत्न केले असल्याचे पंकजा यांनी म्हटले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Beed News : 'पेरलं कुणी, मशागत कुणी केली, बजरंग बाप्पा कापणीला आले', पंकजा मुंडेंचा टोला
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement