टेक्नॉलॉजीचा गैरवापर! पुण्यात फ्लॅट बनला 'ड्रग फॅक्टरी'; MBA पदवीधरांची AIच्या मदतीनं घरात करोडोंची गांजा शेती

Last Updated:

या दोघांनी गांजा पिकवण्यासाठी मातीऐवजी पाण्याचा वापर करणारे 'हायड्रोपोनिक' तंत्रज्ञान निवडले होते. फ्लॅटमधील तापमान, आर्द्रता आणि रोपांची वाढ नियंत्रित करण्यासाठी त्यांनी AI आधारित उपकरणांचा वापर केला होता

घरात गांजा शेती
घरात गांजा शेती
पुणे: विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातून शिक्षणाला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हिंजवडी येथील एका उच्चभ्रू सोसायटीतील फ्लॅटमध्ये AI आणि हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गांजाची शेती केली जात असल्याचा पर्दाफाश पुणे पोलिसांनी केला आहे. विशेष म्हणजे, हे रॅकेट चालवणारे तरुण MBA पदवीधर असून त्यांनी आपल्या फ्लॅटलाच एका अत्याधुनिक 'ड्रग फॅक्टरी'चे स्वरूप दिले होते.
पोलिसांनी याप्रकरणी सुमित देदवाल (२५) आणि अक्षय मेहर (२५) या दोन तरुणांना अटक केली आहे. या दोघांनी गांजा पिकवण्यासाठी मातीऐवजी पाण्याचा वापर करणारे 'हायड्रोपोनिक' तंत्रज्ञान निवडले होते. फ्लॅटमधील तापमान, आर्द्रता आणि रोपांची वाढ नियंत्रित करण्यासाठी त्यांनी AI आधारित उपकरणांचा वापर केला होता. अत्यंत उच्च दर्जाचा मानला जाणारा ‘OG-Kush’ गांजा ते या लॅबमध्ये पिकवत होते.
advertisement
या रॅकेटचे कामकाज पूर्णपणे डिजिटल आणि हाय-टेक होते. गांजाच्या उत्पादनासाठी लागणारे बियाणे आणि इतर साहित्य हे 'डार्क वेब' आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मागवले जात असे. पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी हे आरोपी व्यवहारासाठी 'क्रिप्टोकरन्सी'चा वापर करत होते. तपासात असेही समोर आले आहे की, गांजाची खेप थायलंडवरून 'इलेक्ट्रॉनिक सामान' असल्याचे भासवून भारतात मागवली जात होती.
advertisement
मुंबईपर्यंत पसरली तपासाची चक्रे: हिंजवडीतील छाप्यात पोलिसांनी ४५ लाख रुपयांचा मुद्देमाल आणि महागडी उपकरणे जप्त केली. अटकेत असलेल्या आरोपींच्या चौकशीतून या रॅकेटचे धागेदोरे मुंबईपर्यंत पोहोचले. पुणे पोलिसांनी मुंबईत धाड टाकून सप्लायर मालय राजेश देलीवाला आणि स्वराज भोसले यांना बेड्या ठोकल्या. मुंबईतील कारवाईत सुमारे २.८ कोटी रुपयांचे हॅश, सीबीडी ऑइल आणि गांजा असा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला आहे.
advertisement
पुणे पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अंमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले आहेत. सुशिक्षित तरुण तंत्रज्ञानाचा वापर करून अशा गुन्हेगारी मार्गाकडे वळत असल्याने प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
टेक्नॉलॉजीचा गैरवापर! पुण्यात फ्लॅट बनला 'ड्रग फॅक्टरी'; MBA पदवीधरांची AIच्या मदतीनं घरात करोडोंची गांजा शेती
Next Article
advertisement
Manikrao Kokate: महायुती सरकारमधील दुसऱ्या मंत्र्यांची विकेट, कोकाटे यांचा राजीनामा अखेर मंजूर
महायुती सरकारमधील दुसऱ्या मंत्र्यांची विकेट, कोकाटे यांचा राजीनामा अखेर मंजूर
  • महायुती सरकारमधील दुसऱ्या मंत्र्यांची विकेट, कोकाटे यांचा राजीनामा अखेर मंजूर

  • महायुती सरकारमधील दुसऱ्या मंत्र्यांची विकेट, कोकाटे यांचा राजीनामा अखेर मंजूर

  • महायुती सरकारमधील दुसऱ्या मंत्र्यांची विकेट, कोकाटे यांचा राजीनामा अखेर मंजूर

View All
advertisement