करिश्मा मुलांचा विश्वातघात! 1900 कोटी सोडा एक रुपयाही नाही मिळाला? संजय कपूर संपत्ती वादात नवा ट्विस्ट

Last Updated:

Sunjay Kapur Property Dispute : संजय कपूरच्या 30,000 कोटींच्या संपत्तीमधील 1900 कोटी करिश्माच्या मुलांना मिळणार आहे म्हटलं जात होतं. पण 1900 कोटी सोडाच आता एक रुपयाही मिळणार की यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. 

News18
News18
मुंबई :  अभिनेत्री करिश्मा कपूरच्या एक्स नवऱ्याचं संजय कपूरचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या संपत्तीचा मोठा वाद सुरू आहे. करिश्मा कपूरची मुलं समायरा आणि कियाना कपूर हे वडिलांच्या संपत्तीवर हक्क सांगण्यासाठी कोर्टात गेले होते. संजय कपूरच्या 30,000 कोटींच्या संपत्तीमधील 1900 कोटी करिश्माच्या मुलांना मिळणार आहे म्हटलं जात होतं. पण 1900 कोटी सोडाच आता एक रुपयाही मिळणार की यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.
संजय कपूरच्या मृत्यूनंतर त्यांच्या मालमत्तेवरून कुटुंबात वाद सुरू झाला आहे. हे प्रकरण न्यायालयात पोहोचले आहे. पहिल्यांदा संजय कपूरची आई, नंतर त्याची बहीण आणि आता करिश्माची मुले यांनी त्यांच्या सावत्र आई प्रिया सचदेव कपूर यांच्याविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात फसवणुकीचा आरोप करत खटला दाखल केला आहे.
advertisement
करिश्माच्या मुलांना दावा केला आहे की,  त्यांच्या वडिलांचे मृत्युपत्र दडपण्यात आले असून त्यात छेडछाड करण्यात आली आहे. समायरा कपूर आणि कियान कपूर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर गेल्या आठवड्यात सुनावणी झाली. तेव्हा प्रिया कपूरच्या वकिलाने दिल्ली उच्च न्यायालयात दावा केला की करिश्माच्या मुलांना आरके फॅमिली ट्रस्टद्वारे 1900 कोटी (अंदाजे $1.9 अब्ज) मिळाले आहेत. परंतु आता असे वृत्त आहे की करिश्मा कपूरच्या मुलांना त्यांचा हक्काचा वाटा मिळालेला नाही.
advertisement

करिश्मा कपूरच्या मुलांना हक्काचा वाटा नाही

फायनान्शियल एक्सप्रेसमधील वृत्तानुसार, ही रक्कम सोना कॉमस्टारच्या शेअर्सच्या मूल्यावर आधारित आहे. परंतु मुलांना अद्याप कोणतेही शेअर्स मिळालेले नाहीत. एका सूत्राने सांगितले की, "या मालमत्ता प्रिया सचदेव कपूर यांच्या नियंत्रणाखाली आहेत आणि मुलांना त्या मिळण्याचा कोणताही अधिकार नाही."
वृत्तानुसार, समायरा आणि कियान यांना अद्याप त्यांच्या वडिलांच्या मृत्युपत्राची प्रत किंवा त्यांच्या वैयक्तिक मालमत्तेचा कोणताही तपशील मिळालेला नाही. करिश्माचे वकील, वरिष्ठ वकील महेश जेठमलानी म्हणाले, "हा खटला ट्रस्टच्या फायद्यांबद्दल नाही, तर संजय कपूरच्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि त्यांच्या वैयक्तिक मालमत्तेत त्यांचा योग्य वाटा सुनिश्चित करण्यासाठी आहे."
advertisement

दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश

दिल्ली उच्च न्यायालयाने प्रिया कपूरला तिच्या सर्व जंगम आणि स्थावर मालमत्तेची माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने मृत्युपत्र तपासले आणि ते प्रियाच्या वकिलांना परत केले. ते समायरा आणि कियानसोबत शेअर केले जाऊ शकते परंतु त्यांना नॉन-डिक्लोजर करारावर स्वाक्षरी करावी लागेल.
मराठी बातम्या/मनोरंजन/
करिश्मा मुलांचा विश्वातघात! 1900 कोटी सोडा एक रुपयाही नाही मिळाला? संजय कपूर संपत्ती वादात नवा ट्विस्ट
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement