Disaster Movie: 2025 चा सर्वात मोठा डिजास्टर सिनेमा, आधी थिएटरमध्ये फ्लॉप आता नेटफ्लिक्सवरुनही हटवला

Last Updated:

Disaster Movie:सिनेसृष्टीत या वर्षी एक भव्य अ‍ॅक्शन चित्रपट प्रदर्शित झाला होता. तब्बल 2 तास 19 मिनिटांचा हा सिनेमा मोठ्या स्टारकास्टसह आला आणि प्रदर्शित होण्याआधीच चर्चेत राहिला.

2025 चा सर्वात मोठा डिजास्टर
2025 चा सर्वात मोठा डिजास्टर
मुंबई : दक्षिणात्य सिनेसृष्टीत या वर्षी एक भव्य अ‍ॅक्शन चित्रपट प्रदर्शित झाला होता. तब्बल 2 तास 19 मिनिटांचा हा सिनेमा मोठ्या स्टारकास्टसह आला आणि प्रदर्शित होण्याआधीच चर्चेत राहिला. प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा होत्या, कारण निर्मात्यांनी यासाठी तब्बल 300 कोटी खर्च केले होते. मात्र सिनेमा जोरात आपटला एवढंच नाही तर आता हाच सिनेमा ओटीटीवरुनही हटवण्यात आला आहे.
अजित कुमार, त्रिशा कृष्णन आणि अर्जुन दास यांचा बहुचर्चित तमिळ अ‍ॅक्शन चित्रपट ‘गुड बॅड अग्ली’ प्रेक्षकांसमोर आला आणि एका वेगळ्याच वादात सापडला. अधिक रविचंद्रन दिग्दर्शित हा सिनेमा 25 एप्रिल 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र, प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. जगभरातून मिळून या चित्रपटाने फक्त 248.2 कोटी कमावले. यामुळे निर्मात्यांना जवळपास 250 कोटींचे नुकसान सहन करावे लागले.
advertisement
बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरल्यावर, निर्मात्यांनी हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. 8 मे 2025 रोजी ‘गुड बॅड अग्ली’ नेटफ्लिक्सवर तमिळ, हिंदी, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत रिलीज झाला. सुरुवातीला या चित्रपटाने नेटफ्लिक्सच्या टॉप 10 ट्रेंडिंग लिस्टमध्ये जागा मिळवली.
advertisement
याचवेळी मोठी समस्या उद्भवली. चित्रपटात संगीतकार इलैयाराजाची तीन गाणी त्यांच्या परवानगीशिवाय वापरली गेल्याचे समोर आले. इलैयाराजाने थेट न्यायालयात धाव घेतली. कोर्टाच्या आदेशानंतर नेटफ्लिक्सला हा सिनेमा तात्काळ काढून टाकावा लागला. त्यामुळे ‘गुड बॅड अग्ली’ आता नेटफ्लिक्स इंडियावर उपलब्ध नाही.
या चित्रपटाची कथा अजित कुमारच्या ए.के. नावाच्या अंडरवर्ल्ड डॉन भोवती फिरते. त्रिशा कृष्णन आणि अर्जुन दास यांच्या दमदार भूमिकांनी सिनेमाला स्टारपॉवर मिळाली, पण कथानक आणि सादरीकरणावर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Disaster Movie: 2025 चा सर्वात मोठा डिजास्टर सिनेमा, आधी थिएटरमध्ये फ्लॉप आता नेटफ्लिक्सवरुनही हटवला
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement