Priyanka Chopra : 'प्रियांका चोप्राचं सुपरस्टारसोबत सीरियस अफेअर' प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितली 'आतली गोष्ट'
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Priyanka Chopra : बॉलिवूडमधील सर्वात चर्चित अभिनेत्रींपैकी एक असलेली प्रियांका चोप्रा आज ग्लोबल स्टार बनली आहे. तिच्या करिअरसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यावरही अनेकदा चर्चा झाली आहे.
मुंबई : बॉलिवूडमधील सर्वात चर्चित अभिनेत्रींपैकी एक असलेली प्रियांका चोप्रा आज ग्लोबल स्टार बनली आहे. तिच्या करिअरसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यावरही अनेकदा चर्चा झाली आहे. अलीकडेच एका दिग्दर्शकाने खुलासा केला की, प्रियांकाचं नाव एकेकाळी एका बॉलिवूड सुपरस्टारसोबत जोडले जात होतं. ती सिरियस रिलेशनशिपमध्ये होती.
फेमस ॲड गुरु प्रल्हाद कक्करने नुकतंच एका मुलाखतीमध्ये प्रियांका चोप्राच्या नात्याविषयी खुलासा केला. जरी कक्कर यांनी थेट नाव घेतले नाही, तरी इंडस्ट्रीमध्ये ही चर्चा होती की प्रियांका आणि शाहरुख खान यांचं अफेअर होतं. त्यांची जवळीक डॉन आणि डॉन 2 दरम्यान खूप गाजली होती. त्या वेळी त्यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. मात्र, प्रियांकाने कधीच या नात्याबद्दल काहीही मान्य केले नाही. कक्कर म्हणाले, "ती अतिशय गंभीर आणि मेहनती अभिनेत्री आहे. तिला नको होतं की तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल लोकांनी लिहावं किंवा बोलावं."
advertisement
प्रियांकाचा प्रवास मात्र संघर्षांनी भरलेला होता. 2000 मध्ये तिने फेमिना मिस इंडियामध्ये पहिली उपविजेती पद मिळवलं, तर लारा दत्ता विजेती ठरली. याच वर्षी प्रियांकाने मिस वर्ल्ड किताब जिंकून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपलं नाव केलं. त्या काळात तिच्या रंगावर आणि लूकवर अनेक टीका झाल्या, पण तिने त्याकडे दुर्लक्ष केलं.
advertisement
दोस्ताना या चित्रपटासाठी तिने जॉन अब्राहम आणि अभिषेक बच्चनसोबत काम करताना आपल्या शरीरयष्टीवर खूप मेहनत घेतली. फिटनेस, फॅशन आणि धाडसी निवडींमुळे ती लवकरच टॉप हिरोईन बनली. फॅशन, बर्फी, बाजीराव मस्तानी, मेरी कोम यांसारख्या चित्रपटांनी तिला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिले.
केवळ बॉलिवूडपुरती मर्यादित न राहता, प्रियांकाने हॉलिवूडमध्ये मोठा धोका पत्करला. तिने क्वांटिको या अमेरिकन मालिकेत मुख्य भूमिका साकारली आणि जागतिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यानंतर तिने बेवॉच, इट्स ऑल कमिंग बॅक टू मी यांसारख्या चित्रपटांत काम करून स्वतःला ग्लोबल आयकॉन म्हणून सिद्ध केलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 17, 2025 2:01 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Priyanka Chopra : 'प्रियांका चोप्राचं सुपरस्टारसोबत सीरियस अफेअर' प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितली 'आतली गोष्ट'