Shreyas Iyer वर दु:खाचा डोंगर! हृदयाच्या जवळच्या पार्टनरला गमावलं; Video शेअर करत दिली 'बॅड न्यूज'
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Shreyas Iyer Pet Dog Betty Passes Away : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर श्रेयस अय्यर याने सोशल मीडियावरून दु:खद बातमी दिली आहे. श्रेयसने त्याच्या हृदयाच्या जवळच्या व्यक्तीला गमावलं आहे.
Shreyas Iyer Share Emotional Video : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर श्रेयस अय्यर याला आशिया कपमध्ये संधी न मिळाल्याने तो नैराश्यात असल्याचं त्याच्या वडिलांनी म्हटलं होतं. सध्या श्रेयस अय्यर इंडिया 'ए' संघाचा कर्णधार आहे. हा संघ लखनऊमध्ये ऑस्ट्रेलिया 'ए' संघासोबत दोन चार दिवसीय मॅच खेळत आहे. या मॅचच्या माध्यमातून त्याला टेस्ट टीममध्ये पुन्हा स्थान मिळवण्यासाठी चांगली संधी मिळाली आहे. त्याचं सोनं श्रेयस करणार का? असा सवाल विचारला जात आहे. अशातच आता श्रेयसने सोशल मीडियावर दु:खद बातमी दिली.
पाळीव प्राण्यासोबतच्या काही आठवणी
श्रेयस अय्यर याने इन्टाग्रामवर एक पोस्ट केली. यामध्ये त्याने व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओच्या माध्यामातून त्याने सर्वांना दु:खद बातमी दिली. व्हिडिओमध्ये अय्यर आणि त्याचा पाळीव कुत्रा दिसतोय, खरं तर अय्यरने त्याच्या पाळीव प्राण्यासोबतच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत कारण तो आता या जगात नाही. रेस्ट इझी माय एंजल, असं म्हणत श्रेयसने आपल्या लाडक्या कुत्र्याला श्रद्धांजली वाहिली आहे.
advertisement
advertisement
वेस्ट इंडिजविरुद्ध संधी मिळणार का?
दरम्यान, याव्यतिरिक्त, त्याने नुकतेच पंजाब किंग्सचे आयपीएलमध्ये नेतृत्व केले होते, ज्यात संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. एशिया कपच्या संघात त्याचा समावेश न झाल्याने काही प्रमाणात नाराजी व्यक्त झाली होती, पण आता तो 'इंडिया ए' संघात चांगली कामगिरी करून राष्ट्रीय संघात परत येण्याचा प्रयत्न करत आहे. आगामी वेस्ट इंडिज स्कॉडमध्ये तरी श्रेयसला संधी मिळणार का? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 17, 2025 1:49 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Shreyas Iyer वर दु:खाचा डोंगर! हृदयाच्या जवळच्या पार्टनरला गमावलं; Video शेअर करत दिली 'बॅड न्यूज'